विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणा-या माजी सैनिक/पत्नी, पाल्यांकडून गौरव पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित…

नागपूर विभागीय प्रतिनिधी ऋग्वेद येवले

         भंडारा: जिल्हातील सर्व माजी सैनिक तसेच त्यांच्या विधवांना सूचित करण्यात येते की,राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त खेळाडू साहित्य, संगीत, गायन, नृत्य इत्यादि क्षेत्राती पुरस्कार विजेते यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे तसेच देश राज्याची प्रतिष्ठा वाढवतील.

        अशा स्वरुपाचे लक्षणिय काम करणारे माजी सैनिक पत्नी, पाल्य तसेच माजी सैनिकांच्या पाल्यास शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये इयत्ता १० वी १२९०% पेक्षा अधिक गुण मिळाले असतील तर त्यांनी त्यांचा अर्ज,मार्कशिट व बोनाफाईड प्रमाणपत्र घेऊन १५ सप्टेंबर २०२३ पर्यत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, भंडारा येथे अर्ज सादर करावे.

         असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भंडारा यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.अधिक माहितीकरीता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय ,भंडारा येथे कार्यालयीन वेळेत संपर्क करावा.