दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे विभागीय
पुणे : जिल्ह्याच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे जनतेच्या कामासाठी अहोरात्र झटणारे तसेच सामाजिक कार्यातून लोकप्रिय झालेले माजी आमदार जगन्नाथ बापू शेवाळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे आदेशाने पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे. यावेळी खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक काकासाहेब चव्हाण तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर हे अजित पवार गटात दाखल झाल्याने शेवाळे यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. जगन्नाथबापू शेवाळे हे शरद पवार यांचे खंदे समर्थक आणि विश्वासू सहकारी म्हणून पुणे जिल्ह्यात परिचित आहे, विधानपरिषद सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून सुध्दा त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.
शरद पवार यांनी पुन्हा माझ्या वर टाकलेला विश्वास व जिल्हाध्यक्ष पद देऊन काम करण्याची दिलेली संधी गोर गरिबांचा सेवेत आपण अर्पण करू मिळालेल्या पदाचा उपयोग सर्व सामान्यांच्या समस्यांचे निराकरण व पक्षाच्या विचारसरणीला समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करिन तसेच आपण जिल्हाध्यक्ष पदावरून पक्षला बळकट करून संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादीचा विस्तार करणार आहे असे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांनी सांगितले.