पत्निला वाचविण्याच्या कुशल कर्तव्यात कुलरच्या कॅरन्ट मुळे गजानन टेकामचा मृत्यू… — दुर्दैवी तथा दुःखद घटना…

 

ऋषी सहारे

संपादक

 

गडचिरोली _ रामपूरी वार्ड गडचिरोली येथील गजानन टेकाम वय ५० वर्ष यांचा कुलर चा कॅरन्ट लागून दि. 3 सप्टेंबर ला मृत्यु झाला.

          घटनाक्रम असा की पत्नी रशिका गजानन टेकाम वय ४७ वर्ष ही कुलर सुरच असताना झाडलोट करीत असताना तिच्या साडीचा पदर कुलरच्या पंख्याच्या पात्यात अडकला.

        त्यामुळे तिने आरडा ओरड केली असता पती गजानन बाथरुममधे असताना तो धावत कुलर जवळ जावून त्याने चक्क चालू अवस्थेत असलेला कुलर उचलला.

       त्यामुळे कॅरन्ट लागुन तो खाली कोसळला.पत्नी राशिका मात्र बाल _ बाल बचावली.

           गजानन यांना सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत्यु घोषीत केले. त्यांच्या अकस्मित मृत्युमुळे रामपूरी वार्डात हळहळ व्यक्त करण्यात आली.