भिसी पोस्ट ऑफिस अतंर्गत एक महिन्यापासून रजिस्टर करणे बंद.. — गंभीर समस्या,असंवेदनशीलतेचा कार्यभाग…

 

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

        वृत्त संपादीका 

        पोस्ट ऑफिस म्हणजे जनतेच्या आर्थिक व्यवहारांची व पत्र व्यवहाराच्या सेवेची दैनंदिन नाड आणि कर्तव्य कार्यभाग.

           मात्र रजिस्टर संबंधाने पावती देणारी मशीन बंद असल्याने व मनुष्य बळाच्या समस्यांमुळे मागील एक महिन्यापासून रजिस्टर सेवा बंद असल्याचे दखल न्यूज भारतचे मुख्य संपादक व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ उपाध्यक्ष यांना आज सकाळी ९ वाजताच्या दरम्यान पोस्ट ऑफिसच्या संबंधितांकडून सांगण्यात आल्याने त्यांना धक्काच बसला!

               भिसी हे अप्पर तालुका व नगर परिषदेचे ठिकाण आहे.या गावची लोकसंख्या २५ हजाराच्या जवळपास आहे.याचबरोबर जवळपासच्या गावचे सर्व ग्रामीण नागरिक आवश्यक कामानिमित्ताने भिसीला दररोज येतात,यात पोस्ट ऑफिसचे कामे अंतर्गत असतातच…

            गडपिपरी येथील आशीष श्रिरामे व दखल न्यूज भारतचे मुख्य संपादक प्रदीप रामटेके रजिस्टर करायला चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा भिसी येथील पोस्ट ऑफिस येथे गेले असता,त्या दोघांनाही रजिस्टर करणे बंद असल्याचे भिसी पोस्ट ऑफिसच्या संबंधितांकडून सांगण्यात आले.

           भिसी सारख्या अप्पर तालुक्याच्या पोस्ट ऑफिस मधून रजिस्टर सेवा मागील एक महिन्यापासून बंद असल्याने संबंधित रजिस्टर कर्त्यांना आश्चर्य वाटले व याचबरोबर पोस्ट ऑफिसच्या असंवेदनशील कार्याचा भाग उघडा पडला.

             भिसी पोस्ट ऑफिस मध्ये रजिस्टर पोस्टल करणारा कर्मचारी केव्हा रुजू होणार?व रजिस्टर पावती देणारी मशीन केव्हा सुरु करणार?या समस्या अंतर्गत गंभीर मुद्दा आवासून पुढे आला आहे.