कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी
पंचायत समिती पारशिवनी अंतर्गत येणाऱ्या समूह साधन केंद्र तामसवाडी द्वारा दिला जाणारा केंद्रस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इटगाव येथील विज्ञान विषय शिक्षिका प्रतिभा प्रकाश क्षीरसागर यांना जाहीर करण्यात आला.
समूह साधन केंद्र तामसवाडी द्वारा दरवर्षी शिक्षक दिनाच्या पर्वावर केंद्रातील एका शिक्षकाला हा पुरस्कार प्रदान केल्या जातो. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इटगाव येथील विज्ञान विषय शिक्षिका प्रतिभा प्रकाश क्षीरसागर यांच्या तीस वर्षातील उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन तामसवाडी केंद्रस्तरीय निवड समितीने केंद्रस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कारासाठी निवड केली.
५ सप्टेंबर शिक्षक दिनाच्या पर्वावर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इटगाव ( पारशिवनी)येथे होणाऱ्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येणार आहे. असे निवड समितीचे अध्यक्ष केंद्रप्रमुख दिगांबर धवराळ, संयोजक नंदकिशोर बावनकुळे यांना कळविले आहे.