प्रेम गावंडे
उपसंपादक
दखल न्युज भारत
यवतमाळ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जिल्हा क्रीडा परिषद,नेहरू युवा केंद्र,युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार,हॉकी असोसिएशन ऑफ डिस्ट्रिक्ट यवतमाळ,आकाश चिकटे स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने,हॉकी पटू मेजर ध्यानचंद जयंती व राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या औचीत्यावर जिल्हास्तरीय हॉकी प्रतियोगिता
भव्य स्वरूपात करण्यात आली.
मूले व मुलींच्या एकत्र सहभाग असलेल्या जिल्ह्यातील 16 चमूनी सहभाग घेतला.जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुड यांनी ध्यानचंद यांच्या प्रतिमेस मल्याअर्पण करून नारळ फोडून हाकी प्रतियोगिताचा शुभारंभ केला.
औपचारिक उद्घाटन असोसिएशनचे उपाध्यक्ष हरिहर मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नेहरू युवा केंद्राचे अनिल ढेगे,राष्ट्रीय खेळाडू बबलू यादव,यशवंत इसरानी,राजेश पाटील,साहेबराव राठोड,वासुदेव महल्ले पाटील,अशोक कोंडेकर,अजय अकोलकर,सनराइज स्कूलचे दिनेश पवार,मनीष कासलीकर,डॉ.महेश सारोळकर,अर्बन बँकेचे उपाध्यक्ष प्रा. नितीन खचरे,रत्नाकर पजगडे,सुनील भुसार,प्रवीण कळसकर,नवोदय विद्यालयाचे झेंडे,श्रुती कोलवाडकर,राहुल वंजारी आदी मान्यवर उपस्थित होते.
संयोजक मनीषा आकरे यांनी प्रास्ताविक व स्वागत पर भाषण केले.कु.स्मृती देशमुख यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
याप्रसंगी सनराइज् इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्ती वर मनमोहक नृत्य सादर केल्यावर आतिषबाजी करण्यात आली.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू श्वेता धुमाळ,श्रेया वासेकर,गायत्री पुरी,मंथन गोलाईत,दर्शन वाघाडे,करण वाढई,जयश्री कुडे,मानसी धुमाळ,पलक सवाईमुल,अंकिता अतकरे यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.
दिवस आर.एस.के अकॅडमीच्या क्रीडांगणावर प्रेक्षणीय सामने झालेत.त्यात झरी तालुक्याच्या चमूने पांढरकवडा चमुचा पराभव करून आपल्या प्रथम स्थान पटकावले तर तिसऱ्या क्रमांकावर उमरखेड व चतुर्थ स्थानावर मारेगावची चमू राहिली.
पारितोषिक वितरण व समापन सोहळा आकाश चिकटे अकॅडमी चे मनोज इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली झाला.यावेळी राजेंद्र डांगे यांचा वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला.
प्रमुख अतिथी म्हणून ऋषिकेश टाके,संजय कोल्हे,अजय मिरकुटे उपस्थित होते.संचालन जितेंद्र सातपुते व आभार प्रदर्शन श्रुती कोलवाडकर यांनी केले- ढोल ताशाचा गजर व आतिषबाजीने स्पर्धेचा समारोप झाला.
स्पर्धेत प्रत्येक हरणाऱ्या चमूतील खेळाडूंना सामना वीर म्हणून पुरस्कृत करून सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात आले.
पंच म्हणून धनराज शेखदार,बॉबी बागडे,करण चव्हाण,सौरभ तांदूळकर,शिव बोरकर,प्रतीक झोंबाडे,हर्षा इंगळे,काजल तायडे,अजय उमाळे,गुड्डू ब्रदर,विकी गिरी,अंकिता कपिले,यांनी काम केले.
आयोजनासाठी शुभम खंदरकर,अतीक शेख,सपना वानखडे,गोपी आनंद,सुरज कोंपेलवर,यश धुमाळ,अभिजीत पवार, व हॉकी असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यात सहकार्य केले.