अरमान बारसागडे
तालुका प्रतिनिधी
नेरी :-
चिमूर तालुक्यातील मौजा खुटाळा (मो.) येथील शिक्षक श्री. मुरलीधर कामडी हे दिनांक ३१/८/२०२३ रोज गुरूवरला सेवेवरुन कार्यमुक्त झाले.
सेवा निवृत्ती प्रसंगान्वये त्यांचा सत्कार ग्रामपंचायत खुटाळा (मो.) व शाळा व्यवस्थापन समिती खुटाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आज आयोजित करण्यात आला होता.
सत्कार समारंभ प्रसंगी श्री. कामडी सर यांचा सपत्नीक भेटवस्तू व शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
सत्कार प्रसंगी सरपंच कु.मृणालीताई बोरकर,उपसरपंच श्री.विनोदराव बारसागडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. कचरुजी श्रीरामे,उपाध्यक्ष सौ. मधुरीताई बारसागडे,जी.प. शाळा मुख्याध्यापक श्री.गजानन काहुरके सर तसेच शिक्षवृंद,पो. पा. मिनक्षिताई गायकवाड,ग्रा. सदस्य श्री. तुलारामजी बारसागडे,सुधाकरजी सोनवणे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य जगदीश डहारे,कौशिक रामटेके, शालेय विद्यार्थी व पालकवर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाअंती विद्यार्थ्यांना अल्पोहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.