युवराज डोंगरे
खल्लार
उपसंपादक
गेल्या महिनाभरापासून पावसाने पूर्णपणे उघडदीप दिली असल्याने शेतकऱ्यांना या हवामान बदलाचा मोठा फटका बसला असून हवामान विभाग सुध्दा यावर्षी अचूक अंदाज देण्यात पूर्णपणे असमर्थ ठरला आहे.
तद्वतच पावसाने पाठ फिरवली असून सोयाबीन पिकाचा फुलोर गळाला तर महत्त्वपूर्ण मानल्या जाणारे कपासी व तूर हे पिके सुद्धा शेवटच्या घटका मोजत आहेत.
यंदाच्या खरिपात पावसाचा मोठा खंड पडला असून शेकडो वर्षापूर्वीचा हा खंड मानल्या जात आहे.
दर्यापूर तालुक्यातील पिकांनी पावसाच्या पाण्यावर तक धरला होता.मात्र आता पाऊस पूर्णपणे बंद झाला असल्याने शेतकऱ्याची सर्व स्तरातून आर्थिक कोंडी होत आहे.सोयाबीन पिकाला अधिक पाऊस हा पोषक ठरत असतो.त्या तुलनेत पाऊस पडला नसल्याने सोयाबीन पीक येण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.यावर्षी शेती मशागतीला उसनवारी करून लावलेला पैसा निघणे सुद्धा मुश्किल झाले आहे.
शासनाच्या वतीने थोड्या अधिक प्रमाणात आर्थिक मदत होईल का ? या आशेवर शेतकरी आपल्या अपेक्षा अपेक्षित ठेवत आहेत.आणखी एक आठवडा पाऊस न आल्याने पिके पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर राहतील.पावसा अभावी पिकांची वाढ थांबली आहे आणि अनेक रोगांनी पिकांवर आक्रमण केले आहे.
अशा प्रतिकूल परिस्थितीचा शेतकरी सामना करत आहेत हे तितकेच महत्त्वाचे आहे.शासनाच्या वतीने ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देने नितांत गरजेचे आहे.
कोट
“गेल्या एका महिन्यापासून पावसाने पाठ फिरवली असल्याने दर्यापूर अंजनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना या हवामान बदलाचा मोठा फटका बसला आहे.दुबार पेरणीचे संकट यावर्षी शेतकऱ्यांवर ओढवल्या गेले असून शासनाच्या वतीने पिकांचे ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना विना अट आर्थिक मदत द्यावी.
अंकुश पाटील कावडकर
युवासेना उपजिल्हाप्रमुख..