जिल्हा प्रतिनिधि:-अमान क़ुरैशी
दखल न्यूज़ भारत
सिंदेवाही तालुक्यापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरमाडी या गावातील 100 च्या जवळपास विद्यार्थी 5 वी नंतरचे शिक्षण घेण्यासाठी सिंदेवाही या तालुक्याच्या ठीकाणी येतात.
सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान निश्चित बसची ऊपलब्धता नसल्यामुळे विद्यार्थ्यां ना ताटकळत उन्ह-पावसात उभे राहावे लागते.दरम्यानच्या वेळेत अनेक सुपर बसेस निघून जातात.
पण थांबा नसल्याने विद्यार्थी उभे असताना सुद्धा थांबू शकत नाही.करिता मुरमाडी सरपंच यांच्या नेतृत्त्वाखाली मुरमाडीचे सर्व विद्यार्थ्यांनी सिंदेवाही आगार प्रमुख यांना निवेदन देवून बस थांबा देण्याची विनंती केली आहे.
बस थांबा सुरू होईपर्यंत एका विशेष बसची व्यवस्था करून सकाळी 11 तसेच संध्याकाळी 5 वाजता बस उपलब्ध करून विद्यार्थ्यांची रोज होणारी गैरसोय दूर करावी अशी विनंती निवेदनातून केली आहे.