रुपेश बारापात्रे
शहर प्रतीनिधी
आरमोरी –
गडचिरोली ते नागपूर लाल परी आरमोरी समोरील अरसोडा गाव शेजारी बिघाड होऊन बंद पडली होती त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.
दिनांक 30 आगस्ट ला म्हणजे आजच दुपारी चार वाजता चे दरम्यान आरमोरी समोरील मुख्य रस्त्यात महामंडळाची लाल परी बंद पडली होती. गडचिरोली निघालेली बस नागपूरला जात होती.मुख्य रस्त्यात बंद पडल्याने प्रवाश्याना नाहक त्रास सहन करावा लागला आहे.
गाडी क्रमांक एम एच13 सी यू 7403 नंबर ची बस ही गडचिरोली वरून नागपूर साठी निघाली परंतू ती गाडी आरमोरी समोर अरसोडा गाव समोर रोड बंद पडल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करण्याची नामुष्की ड्राइवरवर आली. याचा त्रास प्रवाश्याना सोसावा लागत आहे प्रवासी बस मध्ये ताटकळत बसून दुसऱ्या गाडीची वाट पाहत आहे.
एस टी महामंडळ च्या गाड्या नेहमी रस्त्यावर बंद पडतात कधी बस छप्पर निघतात, बस ड्राइवर ला छत्री घेऊन गाडी चालवावे लागतात असे चित्र आत्ता नेहमीच ऐकला मिळतात. वरून एस टी महामंडळ ला प्रवास्यांच्या जीवाची अजिबात काळजी नाही, प्रवाश्याच्या जीवाशी खेळणे सुरु आहे.
एस टी महामंडळ ने प्रवाश्याच्या जीवाशी खेळणे बंद करावे अन्यथा प्रवासी व नागरिक एस टी महामंडळ च्या विरुद्धत रस्त्यावर उतरेल अशी वेळ एस टी महामंडळ नी येऊ देऊ नये. प्रवाश्याना चांगल्या बसेस उपलब्ध करून सेवा द्यावी अशी नागरिकत मागणी होत आहे.