निरा नरसिंहपुर दिनांक :7
प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे जनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी कडवळ टाकलेले उन्हाळी ज्वारीचे पीक जोमात आले.भीमा व निरा नदींच्या पट्ट्यामध्ये काही दिवसापूर्वी सहकारी साखर कारखाने बंद झाल्यामुळे जनावरांना चाऱ्याची अडचण बसू नये म्हणून गेले तीन महिन्यापूर्वी 60 गुंठे शेतामध्ये कडवळ रूपाने ज्वारी पिक घेतलेले आहे. कडवळ टाकलेले पीक अतिशय जोमात आल्याने. अंदाजे वीस क्विंटल त्या कटवडा पासून ज्वारी निघणार आसल्याचे शेतकरी खुदबुद्दीन शेख बोलत होते. या भागामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ज्वारीचे पीक आल्याने शेतकरी आनंदात आहे. जनावरांना चारा म्हणून टाकलेल्या कडवळापासून ज्वारी यापासून मिळणार असल्याचे सांगण्यात आले. ऐन उन्हाळ्यात फुलपाखरांना खाण्यासाठी काहीच नसल्यामुळे या ज्वारी पिकावर पक्षी टून टून उड्या मारत स्वतः च्या पोटासाठी उदरनिर्वाह करण्यास पक्षांच्या धावा चालू आहे.
शेतकरी हातामध्ये गोपन घेऊन या चाऱ्याची राखण करू लागला .