विकास? — विरोध करणारे व विरोधात बोलणारे दुष्यमन किंवा शत्रू असतातच असे नाही. — कर्तव्याची नितीमुल्ये जपावी कुणी?लोकप्रतिनीधी सांगतील काय?

संपादकीय

प्रदीप रामटेके 

मुख्य संपादक 

         स्वतःला मोठ करण्यासाठी शब्दांची फेक केव्हा कसी केल्या जाईल याचा नेम राहात नाही.याचबरोबर स्वतःचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी धडपडणारे व्यक्तीमत्व अनेक कामात नागरिकांना कसे गुरफटून ठेवेल याचाही थांगपत्ता राहात नाही. 

          योग्य कर्तव्यासाठी व भूमिकांसाठी विरोध करणारे पत्रकार,मतदार,पक्ष प्रतिस्पर्धी व सामाजिक दायित्विक, असल्याशिवाय सर्व क्षेत्रातील यशस्वी-अयशस्वी मनुष्यमात्रांना आणि लोकप्रतिनिधींना(खासदार-आमदार-नगर सेवक-जि.प.सदस्य-प.स.सदस्य,ग्रामपंचायत सदस्य व इतर मतदार नियुक्त सदस्य.) भयमुक्त कर्तव्यातंर्गत उत्तम मार्गक्रमण करता येत नाही किंवा आपल्या उदेशात यशस्वी होता येत नाही हे चिरकाल सत्य आहे. 

         मात्र,योग्य व उत्तम कर्तव्यासाठी विरोधात बोलणारे व विरोध करणारे पत्रकार,मतदार,पक्ष प्रतिस्पर्धी,सामाजिक दायित्विक हे दुष्यमन असतात किंवा शत्रूत्व निर्माण करणारे असतात असे समजून घेणारे सेवक-जनसेवक हे स्वतःच्या कर्तव्याप्रती न्यायसंगत असतातच असे होत नाही.

         म्हणूनच शब्द देणारा जनसेवक म्हणजे लोकप्रतिनिधी हा शब्द पाळणारा असल्याशिवाय सभ्य संस्कृतीचा उजाळा होत नाही आणी सभ्य समाजाचा आधार बनू शकत नाही.

             दुसरे असे की सेवक म्हणजे अधिकारी व कर्मचारी यांची कार्यालयीन जबाबदारी ही प्रामाणिकपणाची असते.आपल्या पदाला नेहमी धैर्यवान व ध्येयनिष्ठ कृतीची जोड त्यांनी ठेवणे अनिवार्य आहे.याशिवाय अधिकारी व कर्मचारी स्वतःप्रती जबाबदार बनू शकत नाही आणि लोकप्रतिनिधी प्रमाणेच समान्य नागरिकांसाठी न्यायप्रिय भुमिका वटवू शकत नाही हेही तितकेच सत्य आहे.

           लोकप्रतिनिधी,अधिकारी, कर्मचारी,हे लोकशाही प्रणाली अंतर्गत नागरिकांच्या सुरक्षेचे,उन्नतीचे,प्रमुख अंग असतात.म्हणूनच त्यांनी नागरिकांचा आधार बनून सभ्य व संस्कृत दायित्वातंर्गत आपापली कर्तव्ये पार पाडली पाहिजे व समाजाची दयनीय दशा,”दिशेत-प्रगतीत-मजबूतीत-समजदारीत व कर्तव्यात बदलवली पाहिजे.एवढेच काय तर देशातील सर्व प्रकारचा भेद व भेदभाव नाहीसा करण्यासाठी आपले कर्तव्य पणाला लावले पाहिजे,हेच त्यांचे संविधानीक कर्तव्य आहेत असे स्पष्ट आहे.

              सेवक व जनसेवक म्हणजे गुलाम नव्हेत तर ते चालक म्हणून देश हिताचा व लोकहिताचा लोकशाही गणराज्य प्रस्थायीला अनुसरून महत्वपूर्ण घटक आहे हे लोकप्रतिनीधिंनी,अधिकाऱ्यांनी,कर्मचाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. 

             तद्वतच विविध योजनातंर्गत करोडो रूपयांची कामे करण्यासाठी सेवक आणि जनसेवक आहेत हा विरोधाभास या भास त्यांनी मनातून काढून टाकला पाहिजे व कामे करणे म्हणजे विकास करणे होय ही मनातील मरगड सुद्धा त्यांनी झिडगारली पाहिजे. 

              देशातील सर्व नागरिकांच्या आर्थिक,शैक्षणिक,औधोगिक,लघु औधोगिक,सामाजिक व राजकीय सहभागावर व सहभागातंर्गत उन्नतीवर देशाचा विकास दर ठरतो आहे,देशाची प्रगल्भता ठरते आहे,देशाचा मानसन्मान ठळकपणे पुढे येतो आहे हे नाकारता येत नाही.

            असे असताना,कामातच देशाचा विकास आहे या राजकीय लोकांच्या बोंबाबोंबीला काय महत्व?

             भारत देशात उघड्यावर झोपणारे नागरिक,भिक्षा मागणारे नागरिक,उपवासी राहणारे नागरिक,कामासाठी वनवन भटकणारे नागरिक,झोपडीत राहणारे नागरिक,निवाऱ्याच्या (घर बांधकाम) व्यवस्थेसाठी जागा मागणारे समस्याग्रस्त नागरिक,रोजगारासाठी धडपडणारे बेरोजगार,शेतमालासाठी योग्य भाव मागणारे निरुत्साही शेतकरी,अतिक्रमण करून शेती कसणारे व त्या जागेचा वहिवाट मालकीहक्क पट्टा मागणारे दारिद्र्य नागरिक,मुलांच्या भविष्यासाठी धडपडणारे निरागस गोरगरीब,यांच्या चेहऱ्यांकडे बघितले तर,”भारतीय नागरिकांची दयनिय गंभीर अवस्था भारताच्या विषमतेचे व दारिद्र्याचे भयानक चित्र रखाटते आहे.

         मग तुम्हीच सांगा,देशातील नागरिकांचा सार्वभौम विकास केल्या जात नसेल तर कामाच्या विकासाचे दररोज गोडवे गाण्यात व दररोज तुनतुने वाजविण्यात सार्थथा व सामर्थता दिसते आहे काय?