
ऋषी सहारे
संपादक
मराठी भाषेचा एक प्रदेश म्हणून महाराष्ट्र हे एक वेगळा राज्य निर्माण करण्यात आले व तसेच गुजरात हे एक वेगळे राज्य निर्माण करण्यात आले. गुजराती मुंबई घेण्यासाठी भरपूर आटापिटा केला परंतु मुंबई त्याना मिळाली नाही. एक मे 1960 रोजी महाराष्ट्र अस्तित्वात आला. जेव्हा महाराष्ट्र अस्तित्वात आला तेव्हा अनेक जिल्हे लोकसंख्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे असल्याने प्रशासकीय शासकीय कामासाठी नागरिकांना जाणाऱ्या येणाऱ्याना खूप अडचण होत होती संपूर्ण दिवस दिवस तिथे जाण्यासाठी लागत होता.
सध्या राज्यांमध्ये अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी नागरिकांना पूर्ण पूर्ण दिवस जात असल्यामुळे नवीन जिल्ह्याची निर्मिती करावी आणि ती करण्यासाठी प्रस्तावना देण्यात आली आहे.
महाराष्ट्र अस्तित्वात येण्यापूर्वी, खानदेश, नाशिक, अहमदनगर सातारा कोल्हापूर सांगली रत्नागिरी अलिबाग आणि बॉम्बे हे 10 जिल्हे होते एक मे 1960 ला दुभाषिक मुंबई राज्याचा विभाजन झाला, पहिले 26 जिल्हे महाराष्ट्र मध्ये आले त्यामध्ये ठाणे कुलाबा आत्ताचे रायगड रत्नागिरी बृहन्मुंबई नाशिक धुळे सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड परभणी धाराशिव नांदेड बुलढाणा अहमदनगर अकोला अमरावती नागपूर धुळे पुणे सांगली सातारा कोल्हापूर वर्धा यवतमाळ जळगाव भंडारा चांदा हे सर्व 26 जिल्हे हे नव्या अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्रात आले.
1981 पासून आतापर्यंत आणखीन नव्हे दहा जिल्हे झाले या जिल्ह्यामधून सिंधुदुर्ग रत्नागिरीतून निर्माण झाला. छत्रपती संभाजीनगर मधून जालना धाराशिव मधून लातूर चंद्रपूर मधून गडचिरोली ब्रह्म मुंबई मधून मुंबई उपनगर अकोला मधून वाशिम धुळे मधून नंदुरबार परभणी मधून हिंगोली भंडारा मधून गोंदिया आणि ठाण्यामधून पालघर व असे दहा जिल्हे निर्माण करण्यात आले. व आता आणखी 22 जिल्हे अस्तित्वात करण्यात आले.
तुमचा नवीन जिल्हा-
22 प्रस्तावित जिल्ह्यांची यादी:-
नाशिक मधील मालेगाव,कळवण
पालघर मधलं जव्हार
अहमदनगर मधील शिर्डी संगमनेर श्रीरामपूर
ठाण्यामधून-भाईदर, कल्याण
पुणे मधून शिवनेरी
रायगड मधून महाड
सातारा मधून माणदेश
रत्नागिरी मधून मानगड
बीड मधून अंबाजोगाई
लातूर मधून उदगीर
नांदेड मधून किनवट
जळगाव मधून भुसावळ
बुलढाणा मधून खामगाव
अमरावती मधून अचलपूर
यवतमाळ मधून पुसद
भंडारा मधून साकोली
चंद्रपूर मधून चीमूर
गडचिरोली मधून अहेरी