वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालय साकोली येथे योग व ध्यान (मेडीटेशन) शिबीराचे आयोजन.

 

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

 

साकोली -वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था नागपूर द्वारा संचालित वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालय साकोली येथे योग व ध्यान( मेडिटेशन ) शिबिराचे आयोजन करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनामध्ये डॉ जितेंद्रकुमार ठाकूर यांनी योग व ध्यान (मेडीटेशन) याचे महत्व सांगितले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील चतुर्वेदी यांनी योगामुळे होणारे फायदे सांगितले व त्याचबरोबर योगा केल्यानी आपण कश्याप्रकारे निरोगी आयुष्य जगू शकतो याची माहिती दिली. योग व ध्यान मार्गदर्शन खूप महत्वाचे आहे कारण धकाधकीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकजण तणावाखाली राहतो. दिवसभर घर- ऑफिसच्या जबाबदाऱ्या आणि कामाची चिंता कायम तणावाचे कारण बनून राहते. तणावाचे कारण काहीही असले तरी आपल्या मानसिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. चांगले जीवन जगण्यासाठी आपल्याला शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या निरोगी असणे आवश्यक आहे. तणाव आणि तणावातून मुक्त होण्यासाठी ध्यान हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. या शिबिरामध्ये मेडीटेशन कश्याप्रकारे करायचे याची माहिती देण्यात आली आणि त्याचबरोबर त्याचे फायदे सांगण्यात आले. मेडीटेशन शांत वातावरणात करावे. आधी शांत बसून व डोळे बंद करून हळूहळू लांब आणि खोल श्वास घ्यावा. आपले लक्ष पूर्णपणे श्वासावर केंद्रित करावे.

त्याचबरोबर विविध प्रकारचे आसन व प्राणायाम करून दाखविले आणि विद्यार्थ्यांकडून करून घेतले. विद्यार्थ्यांनी पण उत्कृष्ट प्रतिसाद दिला. ध्यान केल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. योग्य प्रकारे योग केल्याने शरीर सुदृढ आणि निरोगी ठेवण्यास मदत होते. योगामुळे नकारात्मक विचार दूर होतात ध्यान केल्याने मन शांत होते आणि आपल्या मनातील गोंधळलेले विचार दूर होण्यास मदत होते आणि त्यामुळे तणाव दूर होतो. ध्यान केल्याने शारीरिक आणि मानसिक फायदा होतो. 

या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होते. कार्यक्रमाकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील चतुर्वेदी, डॉ. राजश्री, प्रा. नीरज अतकरी, देवेंद्र इसापुरे, पुकराज लांजेवार शहिद सैयद दिव्या 

व महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शिबिरासाठी अथक परिश्रम केले.