
उमेश कांबळे
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती नगरपरिषद क्षेत्रात 3 किमी अंतरावर केसुर्ली या गावाच्या शेत शिवारात पट्टेदार वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला असून तेथील नागरिकांमध्ये ये जा करीत असताना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
केसुर्ली या गावात चौफेर शेती असून तिथे राहणारे हे शेतकरी वर्ग आहेत आणि त्यांची मुले शाळेत 3 किमी अंतरावर भद्रावती ला ये जा करीत असतात. येथील राहणारे शेतकरी वर्गांना शेतीची कामे करण्यासाठी जीव धोक्यात टाकून वेडेअभावी आपले शेतीची कामे करावी लागतात . गेली 2 ते 3 दिवसा अगोदर या पट्टेदार वाघाने राजू खामनकर या शेतकऱ्याची गाईला मृत्युमुखी पाडले. दहशतीत पसरलेला या ग्रामीण क्षेत्रात केसुर्ली या गावात या पट्टेदार वाघाचा त्वरित बंदोबस्त करून तेथील शेतकरी वर्गांना शेतीची कामे करण्यास सोयीस्कर होईल याबाबतीत प्रफुल चटकी माजी उपाध्यक्ष तथा नगरसेवक यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे