
संपादकीय
प्रदीप रामटेके
स्वातंत्र्य चळवळीत सर्वस्व अर्पन करणाऱ्या विरांना,बलीदान देणाऱ्या शहिदांच्या कुटुंबियांना व हयातीत असलेल्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना वाटतय की चिमूर जिल्हा झाला पाहिजे.आणि त्यांची ही भावना सर्वोत्तोपरी न्यायसंगत सुद्धा आहे.
मात्र राजकारण्यांच्या कोलांट उड्यात चिमूर जिल्हा होणार याची शास्वती आता फार कमी आहे.यामुळे “भाऊ,चिमूर जिल्हा होणार काय?”हाच एकमेव मुद्दा,”चिमूर जिल्ह्याचे,आश्वासन देणाऱ्या सर्व भाऊंच्या कानात सातत्याने घुमवण्यात आला पाहिजे तरच चिमूर जिल्हा होण्याची शास्वती पुढे दिसून येईल.अन्यथा चिमूर जिल्हा होणार असल्याची स्वप्नेच स्वप्ने परत-परत रंगविल्या जातील जातील हे नाकारता येत नाही.
चिमूर जिल्हा करण्यासंबंधाने भौगोलिक क्षेत्राचे परिसीमन आयोगाच्या माध्यमातून विविध अंगान्वये चित्र रखाटने आवश्यक आहे.आणि हे काम विज्ञानातंर्गत तंत्रज्ञानाच्या युगात आता सोपे झाले आहे.
मात्र,चिमूर जिल्हा करण्याची ईच्छा शक्ती,विधानसभा विरोधी पक्षनेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार,आमदार बंटीभाऊ भांगडिया,माजी आमदार डॉक्टर अविनाशभाऊ वारजूकर यांच्या कर्तव्यात आहे काय?हे पहिल्यांदा त्यांच्याकडून परत एकदा मतदारांनी जाणून घेतले पाहिजे.
तद्वतच भावनिक बनवून किंवा खोटे बोलून आमदार,खासदार बनने कठीण आहे,पण अवघड नाही.हे रुपयात तोलणाऱ्यांना माहिती आहे.
याचबरोबर निवडणूक काळात कोणत्याही माध्यमातून रुपयांची उधळपट्टी उमेदवाराने केली तर सदर व्यक्ती हा आपल्या कर्तृत्वावर निवडून आला असे होत नाही.
मात्र,निवडणूक काळात मतदार हा नेमके काय हेरतो,कशाला बळी ठरतो,कसा निर्णय घेतो,किंवा कुठल्याही आमिशाला बळी ठरत नाही,यावर त्यांच्या पुढील भविष्यांचा उज्वल काळ किंवा कर्दनकाळ ठरत असतो.
मतदार निवडणूक काळात आमिशाला बळी पडला तर नागरिकांच्या योग्य मागण्या मागे पाडण्यास निवडणून गेलेले लोकप्रतिनिधी(आमदार/खासदार)चातुर्य दाखवतात हे सुद्धा आपसूकच उघड पडत असते.
चिमूर क्रांती जिल्हा करण्याची मागणी न्यायसंगत व इतिहासीक आहे.असे असताना चिमूर जिल्हा करण्याचे आश्वासन देणाऱ्या तात्कालीन व आताच्या यशस्वी आमदारांनी चिमूर जिल्हा न करण्यामागचे कारण काय असावे?हे तरी त्यांनी जनतेला सांगितले पाहिजे.
चिमूर क्रांती जिल्हा न करण्याबाबत प्रशासकीय किंवा शासकीय अळचणी त्यांनी पुढे करु नये एवढे मात्र नैतिक दृष्ट्या त्यांनी आपले कर्तव्य जोपासले पाहिजे या मताची जनाता असेल हे नाकारता येणार नाही.
म्हणून तिन्ही भाऊंनी एक होऊन चिमूर जिल्हा करुनच दाखवले पाहिजे व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा सदैव आशीर्वाद सोबत ठेवला पाहिजे, ही जनतेची भावना आहे.
पण,या तिन्ही भाऊंमध्ये चिमूर जिल्हा बनविण्यासंबंधाने सामाजिक व राजकीय बांधिलकीची ईच्छाशक्ती आहे काय?