अमृत महाआवास अभियान अंतर्गत आवास योजना साठी तालुकातील पुरस्कृत अधिकाऱ्यांना आज पुरस्कार वितरण… — पंचायत समितीच्या सभागृहात कार्यक्रम… 

 

   कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:- पारशिवनी तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व इतर राज्य पुरस्कृत आवास योजनांना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात स्वातंत्राचा अमृत महोत्सव वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्यात दिनांक २० नोव्हेंबर २०२२ ते दिनांक ०५ जुन २०२३ या कालावधीत अमृत महाआवास अभियान २०२२-२३ राबविण्यात आले होते. 

           या राबविण्यात आलेल्या अभियान उपक्रमाचे मुल्यमापन करून उत्कृष्ट घरकूलाचे बांधकाम करणाऱ्या संस्था, ग्रामपंचायती,घरकूल लाभधारक यांचा दिनांक १८.०८. २०२३ रोजी शुक्रवारला पंचायत समिती पारशिवनी सभागृह येथे दुपारी १२.०० वाजता श्री.अॅड. आशिष जयस्वाल आमदार विधानसभा क्षेत्र रामटेक यांच्या अध्यक्षतेखाली,तसेच सौ. मंगलाताई निंबोने सभापती पंचायत समिती पारशिवनी यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुकास्तरीय उत्कृष्ट घरकूल बांधकाम पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 

        १) सर्वोत्कृष्ट पंचायत समीतीला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण साठी पंचायत समीतीचे गट विकास अधिकारी..

       २) सवोत्कृष्ट ग्राम पंचायतचा पुरस्कार आदिवासी दुर्गम भागातील कोलीतमारा ग्राम पंचायतचे सरपंच कलीराम उईके व ग्रामसचिव सचिन देशमुख…

      ३) सवोत्कृष्ट क्लस्टर राज्य पुरस्कार योजने साठी राज्यातुन प्रथम पुरस्कृत पंचायत समितीचे मनोहर बाबुलाल जाधव यांना देण्यात येणार आहे. 

       सन्मान चिन्ह,प्रशस्तीपत्र व शॉलश्रीफळ देऊन पुरस्कार करण्यात येणार आहे. 

           करिता सर्व सरपंच व सचिव यांनी पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला हजर राहावे.अशी विनंती पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी केली आहे.