प्रतिनिधी : – प्रलय सहारे
वैरागड : – येथील आंबेडकर वॉर्डांत रहवासी असलेला युवक संदिप काशिनाथ कांबळे (वय ४२ वर्षे) याने कदाचित नैराश्याच्या भावनेतून स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची हृदयद्रावक घटना आज दुपारी घडली.
घर कामगार म्हणून मजुरीचे (मिस्त्री) काम करणारा संदिप कांबळे हा युवक अविवाहित असून अनेक दिवसापासून नैराश्याच्या भावनेतून जीवन जगत होता.
यातच त्याला मद्य- पाणाचे वेसन जडले होते. मृतक आणि त्याची आई असे दोघेच घरी राहायचे.आज आई शेतावर गेल्याचे पाहून त्याने घरातच दुपारी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मृतक घरी एकटाच असल्याने संध्याकाळी माहिती उघडकीस आली. याबाबत पोलीस पाटील गोरखनाथ भानारकर यांनी आरमोरी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच प्रेतास उत्तर तपासनीस उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे नेण्यात आले.
पुढील तपास आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिप मंडलिक यांच्या मार्गदर्शनात बिट अंमलदार जयपाल बांबोळे आणि शिपाई विलास कुमरे करीत आहेत.