
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
बापाचे अनेक शब्दात वर्णन आपण वाचले आहे.”बाप,म्हणजे मुलांच्या आयुष्याचा महत्वपूर्ण कणाच!
बाप केवळ जन्मदाताच राहात नाही तर कळत नकळत मुलांच्या आयुष्याचा तो मार्गदाता आणि समजून घेतले तर नेहमीचाच आधार असतो.
बापापुढे समस्या आणि संकटे थिटे पडतात एवढा तो बलाढ्य असतो आणी दु:खांना व वेदनांना बाजूला सारत मुलांच्या आयुष्यांना उभारणी देणारा तो महा ध्यैर्यवान योद्धा असतो.
तद्वतच मुलांच्या मनातले अलगद टिपणारा तो सखोल तत्वज्ञानी असतो.
बाप रंजलेला असो की वैतागलेला असो,बाप दु:खात असो की वेदनात असो,बाप समस्यात असो की संकटात असो,मात्र तो स्वतःला सावरत मुलांच्या हितासाठी,भविष्यासाठी व सुरक्षासाठी सातत्याने धडपडणारा आत्मविश्वासी कंखर पुरुष असतो.
स्वतःचे असंख्य दु:ख व नाहक वेदना पचवून स्वतःच्या चेहऱ्यात आनंद दाखवणारा बाप समजने अवघड असते.
हाच बाप मुलांच्या भविष्यासाठी घाम गाळतोय,श्रम पणाला लावतोय,पण दु:ख आणि वेदना जाणवू देत नाही तेव्हा त्याच्या मनातील भावनांना मोजता येत नाही एवढा तो महा विशाल असतो.
***
“मित्रहो,माझाही,”बाप,असाच माहा विशाल!
श्रमाला,विश्वासाला,ध्येर्याला,दु:खाला,वेदनांना,योजनांना,नियोजनांना,कर्तव्याला,ध्येयाला,यशाला,शिमा राहात नाही.अविरत चेतना निर्माण करणारे व उर्जा देणारे हे शब्द मानसाला शांत बसू देत नाही.
नेहमी कानात घुमणारे वरील शब्द जेव्हा परिस्थितीचा कानोसा घेत सक्रिय करतात तेव्हा मुलांचे संगोपन व त्यांचे भविष्य मनाच्या कोपऱ्यात बाप साठवत असतो.एवढा तो दृढनिश्चयी व कणखर नितीवान असतो.
माझे बाबूजी १७ ऑगस्ट १९९५ ला चिमूर तालुकातंर्गत मौजा नेरी येथे डॉक्टर निमजे यांच्या दवाखान्यात सकाळी ५ वाजून ७ मिनिटांनी हार्ट अटॅकच्या पहिल्या झटक्याने माझ्या हातावर मरण पावले आणि अश्रूंच्या धारा थांबेनाशा झाल्या.सातत्याने दोन दिवस ओलेचिंब असलेले डोळे बरेच सांगत होते.
मुसळधार पाऊस व सभोवताल नद्यांना पूर असतांनाही माझ्या बाबूजींच्या अंतिम दर्शनाला झालेली अलोट गर्दी मला बरेच मर्म व कर्म सांगत होती.
माझे बाबूजी निरक्षर पण ज्ञानाचा भंडार!तद्वतच ते शांत,स्वयंमी,समजदार व कुशल कर्तृत्ववान…
आम्ही चार बहिणभाऊ,आमचे शिक्षण व संगोपण आणि आईचे सातत्याचे आजारपण,बाबूजींना नेहमी चिंताग्रस्त करत होते.
ध्येर्याला शिमा राहात नाही,पण अठराविश्व दारिद्र जेव्हा नेहमी आव्हाणे निर्माण करतय तेव्हा राबराब राबणारा व्यक्ती किती राबेल?हा गंभीर प्रश्न अभ्यासाचा सखोल विषयच…
पण अशाही अवघड विपरीत परिस्थितीत न डगमगता,माझ्या बाबूजींनी आईच्या आरोग्याकडे जातीने बघत आमच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रीत केले.
रात्रंदिवस राबराब राबणाऱ्या माझ्या बाबूजींकडे एक मालदार(सावकार) आला आणि म्हणाला,”अरे ये भिवा,..?उपवासी राहून मरण्यापेक्षा तुझ्या दोन मुलाला महिनेवारी चार पायल्या ज्वारीला नौकर ठेवणारे!
यावर माझ्या बाबूजींचे विनंम्रपणे उत्तर ऐकून मी क्षणभर स्तब्ध झालो होतोय.
बाबूजींचे उत्तर होते,”बाबा हात जोडतोय,अनेकदा उपवासी राहील पण माझ्या मुलांना कुणाचीही चाकरी करु देणार नाही..शिकवतो माझ्या मुलांना माझ्या परिने!…
घरची परिस्थिती बेताची,हातावर आणणे आणि पाणावर खाणे याचा अनुभव अनेकदा आलाय.याचबरोबर अनेकदा उपवासी राहण्याचे प्रसंग झेलतांना मन भरुन येत असे.पण,आम्ही कुणाच्याही दारात गेलो नाहीत.
मन हेलवणारी गरीबी बघता माझ्या बाबूजींनी मला व माझ्या मोठ्या दादाला मातीकामावर नेने सुरु केले.याचबरोबर तेंदूपत्ता सिजन करण्याची,धान रोवणी करण्याची,ज्वारी कापणे व खुडण्याची कामे करायला प्रेरणा दिली.
या कामा मागचा उदेश एकच होता आईचा उपचार,आमचे शिक्षण व पोटभरण्याची धडपड…
बाबूजींनी सातत्याने अती श्रमाचे काबाडकष्ट केले.पण काबाळकष्टांनंतरही रुपयांची गरज भासू लागली तेव्हा साडेतीन एकर जागा,दोन म्हशी,गाई,व बैलांची जोडी विकली.पण आमच्या शिक्षणास बाधा येऊ दिली नाही.
याचबरोबर गंभीर आरोग्य काळात आईची शेवा करण्यासाठी मला सात वर्ष बाबूजींच्या आशीर्वादाने लाभले,हे माझे भाग्यच!
माझी आई सुद्धा शांत,स्वयंमी,समजदार,आणि कर्तृत्ववान होती!
आईवडीलांचे संस्कार आमच्यावर आहेतच!यामुळे आम्ही तिघे भाऊ व एक बहीण असे चौघेही आज पर्यंत भांडलो नाहीत,झगडलो नाहीत किंवा कुणाचा अनादरही आजपर्यंत केला नाही.
माझे मोठे दादा केंद्रीय एक्साइज ऑफीसमध्ये सुपर क्लासवन अधिकारी आहेत तर लहान भाऊ सुपरवायझर आहे. तद्वतच बहीण गृहिणी असून वेल एज्युकेटेड आहे.तिचे पती म्हणजे आमचे जिवलग जावई व्यवस्थापक आहेत.मि व्यक्तिशः पत्रकारिता क्षेत्रात असून सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक पदातंर्गत कार्य केले आहे.
तात्पर्य असे की आयुष्यात हार न मानणारे आत्मविश्वासी व समजदार बाबूजी आम्हाला लाभले हेच आमचे उत्तम कर्म आहे.
त्यांचे अफार काबाडकष्ट आणि त्यांचा समजदार स्वभाव अजूनही आम्हाला प्रेरणा देतय!”बाबूजी आमच्यावर कधीच रागावले नाही,त्यांनी अफार मायेची सावली आम्हाला दिली हे विसरता येत नाही.
“बाबूजी,…
आजच्या स्मृती दिनानिमित्त तुम्हाला विनंम्रपणे कोटी कोटी प्रणाम!
*****
तुमचा चिरंजीव
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक :- दखल न्यूज भारत तथा विदर्भ उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई….