पंचायत समिती परिसरात रानभाजी महोत्सव जिं प सभापतीच्या उपस्थितीत पंचायत समीती सभापती मंगला निबोने च्या हस्ते उदघाटन संपन्न.

कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

        पारशिवनी:-आज दि.१४/०८/२०२३ रोजी तालुका कृषी विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांचे संयुक्त विद्यमाने पंचायत समिती कार्यालय परिसर पारशिवानी येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. रानभाजी महोत्सवाचे उदघाटन  सौ मंगलाताई निंबोने, सभापती पंचायत समिती पारशिवनी, यांचे शुभ हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून श्री.राजूभाऊ कुसुंबे जिल्हा परिषद सदस्य,नागपूर  श्री. संदीपजी भलावी, पंचायत समिती सदस्य पारशिवनी, श्री. सचिन आमले सरपंच ग्रामपंचायत पिपळा,श्री. सुभाष जाधव गट विकास अधिकारी पारशिवानी, श्री. चंद्रकांत देशमुख कृषि अधिकारी पारशिवानी, प्रमोद सोमकुवर आत्मा सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. आर. जे. दाहात तालुका कृषी अधिकारी पारशिवानी, श्रीमती. नंदुरकर कृषि अधिकारी पारशिवानी,श्री. पी. डी. शिरपुरकर मंडळ कृषि अधिकारी कन्हान, पारशिवनी विरेन्द गजभिये . प्रशांत लकडकर. विनोद घारड. समन्वयक मुनेश दुपारे. देवानंद तुमडाम अमित तलमले सह सर्व कर्मचारी तसेच याप्रसंगी पारशिवनी शहरातील ग्राहकांनी अनेक रानभाज्या ची ओळख करून मोठ्या प्रमाणात खरेदी केली.

       यामध्ये काटवल,तेकोडे, अंबाडी, सुरन, कुंदरू, मटभाजी,कडू भाजी,सिलारी भाजी, भुमक भाजी,दवडी भाजी, घोळभाजी, केना भाजी, तरोटा भाजी, शेवगा भाजी, अळू भाजी, बांबू, करवंद, उंबर, पानांचा ओवा, पिंपळ, दिंडा भाजी, कुड्याची फुलं, भुई आवळा, खापरफुटीची पाने, अशा अनेक प्रकारच्या भाज्या प्रदर्शनीमध्ये ग्राहकांना दाखवून त्यासर्व भाज्यांची पाककृती करण्याची पूर्ण माहिती प्रदर्शित करण्यात आली होती. त्यामुळे ग्राहकांना अनेक रानभाज्यांची प्रत्यक्ष ओळख करून मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी रानभाज्यांची खरेदी केली व पाककृतीची माहिती मोबाईल मध्ये फोटो काढून नेली. या कार्यक्रमाचे रूपरेषा व संचालन श्री मनोज नासरे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक पारशिवानी व श्री प्रमोद सोमकुवर सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक पारशिवनी यांनी आभार व्यक्त करून उत्कृष्ट पणे सर्व प्रदर्शनाची तयारी केली. महोत्सवात तालुक्यातील प्रगतशील शेतकरी श्री.विरू गजभिये,राजू दुनेदार,नाना राऊत,हंसराज सर्यम, विलास कामडे,तसेच इतर मान्यवर व महिला बचत गट, सर्व फार्मर प्रोडूसर कंपनी, पारशिवानी तालुक्यातील डोंगर भागात राहणारे सेंद्रिय शेती गटांतील आदिवासी पुरुष व महिला यांनी स्टॉल लावून विविध प्रकारच्या रानभाज्या विक्रीकरीता ठेवल्या होत्या. स्टॉलला भेट देणाऱ्यांनी रानभाजींची ओळख करुन घेतली ,आहारातील त्यांचे महत्व जाणून घेतले तसेच रानभाजी पासून पदार्थांचा आस्वाद घेतला. 

        या कार्यक्रमात पारशिवानी तालुक्यातील सर्व स्टॉल धारकांना प्रोसाहित करण्यासाठी सर्वांना प्रमान पत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्व कृषि सहाय्यक व उमेद अभियान यांचे सहकार्य लाभले व मोठ्या संख्येने शेतकरी व ग्राहक उपस्थित होते..