युवराज डोंगरे
खल्लार/प्रतिनिधी
खल्लार येथील गजानन महाराज मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना काल दि ५ एप्रिलला दुपारच्या सुमारास घडली.
खल्लार येथील गजानन महाराज मंदिर वर्दळीच्या ठिकाणी आहे. या रस्त्याने नागरिकांची नेहमीच वर्दळ सुरु राहते. या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या नागरिकांसाठी दानपेटी ठेवण्यात आली होती.गजानन महाराज प्रगटदिनापासून मंदिरातील दानपेटीत दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांचे दान जमा होते.काल(५ एप्रिल)दुपारच्या सुमारास संधी साधून अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी पळवून त्यातील रोख रक्कम गायब केली व रिकामी दानपेटी हि बेंबळा खुर्द फाट्यानजिक फेकून दिली.
याप्रकरणी खल्लार पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.