
कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
कन्हान : –
स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथकाने २२ बैलांना निर्दयतापुर्वक ट्रकमध्ये कोंबुन जबलपुर कडुन नागपुरकडे नेत असताना नाकाबंदी करून खंडाळा शिवारात ट्रक जप्त करण्यात आला.
अवैधरित्या गोवंश कत्तली करिता घेऊन जाताना पकडुन २८ लाख ३० हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करित तीन आरोपी विरूध्द कारवाई केली व २२ बैलाना गौशाळेत दाखल करून गौवंशाला जिवनदान दिले.
बुधवार (दि.५) जुलै ला पो.स्टे.कन्हान परीसरात स्टाॅफ सह पेट्रोलिंग करीत असता मुखबीर द्वारे खबर मिळाली की जबलपुर कडुन नागपुर कडे ट्रक क्र. एम एच ३१ सीबी ६४९० ने काही इसम अवैधरित्या गोवंश कत्तली करीता घेऊन जात आहे.
या गुप्त माहितीने पंच व स्टाफ चे मदतीने नागपुर बॉयपास चारपदरी महामार्गावरील उडाणपुल खंडाळा शिवारात नाकाबंदी करून सदर वाहन पकडले असता वाहनात २२ बैल गोवंशाला चारा पाण्याची सोय न करता क्रुतेने बांधुन मिळुन आल्याने २२ बैल किमत ३ लाख ३० हजार रूपये व ट्रक किंमत २५ लाख रूपये असा एकुण २८ लाख३० हजार रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन २२ बैल (गौवंश) ला गौशाळा निमटोला येथे दाखल करून जिवनदान देण्यात आले.
यातील आरोपी १) जहुर खान साहेब खान वय ३२ वर्ष रा. कामगार नगर नागपुर, २) अब्दुल राजीक अब्दुल खालीक वय ४४ वर्ष रा. कामठी व सह आरोपी ३) रीजवान हाजी रा. कामठी यापैकी दोन आरोपीना अटक करून त्यांची वैद्यकिय तपासणी करून आरोपी व ट्रक वाहनास पो.स्टे. कन्हान यांचे ताब्यात देवुन त्याचेवर ११ (१) ड प्रा.स. का. ५ (१) ब, ९ प्रा.नि.वा.का. , १०९ भा.दं.वी. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो. स्टे. कन्हान करित आहे.
ही कार्यवाही पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामिण श्री. विशाल आनंद (भा.पो.से.) अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. श्री. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या पथकातील सपोनि अनिल राऊत, हेकॉ विनोद काळे,नाना राऊत, ईकबाल शेख, नापोशि वीरू नरड, पोशि अभिषेक देशमुख, वाहन चालक मोनु शुक्ला आदीनी शिताफितीने यशस्विरित्या पार पाडली.