
धानोरा /भाविक करमनकर
जलजीवन मिशन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व गाव पातळीवरील सहभागीय घटकांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या सदस्यांचे दोन दिवसांचे प्रशिक्षणाचे रांगि येथिल ग्रामपंचायत भवनात दिनांक 5 व 6 जुलै पार पडले.
अश्वमेघ ग्रामीण पाणलोट क्षेत्र विकास व शैक्षणिक संस्था या प्रमुख संशोधन संस्थे अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील गावाचे स्तर -3 अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षण कृती आराखडा बनवण्याची निवड करण्यात आलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत सन 2022 -23 या वार्षिक कृती आराखड्यातील प्रस्तावित गावातील भागधारकांची क्षमता बांधणी करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती स्थानिक पातळीवरील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, जलसुरक्षक स्वच्छग्रही ,स्वायत्ता, महिला बचत गट प्रतिनिधी, रोजगार सेवक आणि गाव पातळीवरील पाणी गुणवत्ता तपासणी करणाऱ्या समिती सदस्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.यात गडचिरोली जिल्ह्यातील 389 ग्रामपंचायत मधील 1945 सहभागी प्रशिक्षणाचे नियोजन जिल्हा त करण्यात आलेले होते.त्यापैकी दोन दिवसाचं प्रशिक्षण धानोरा तालुक्यातील रांगी येथे 57 ग्रामपंचायतीतील 158 गावातील 285 प्रशिक्षण वर्गाची बॅच रांगडी येथे आयोजीत करण्यात आले होते.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष गडचिरोली घ्या वतिने अश्वमेय ग्रामीण पाणलोट क्षेत्र विकास व शैक्षणिक संस्था फत्तेपूर शिवणगाव तालुका तिवसा जिल्हा अमरावती चि संस्था असून जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील 3 चे प्रशिक्षण कामासाठी मुख्य संसाधन केंद्र म्हणून नियुक्त असून संस्थेद्वारा सन 2022 ते 25 वर्षाकरिता सुधारित प्रशिक्षण नियोजन करन्यात आले होते सदर प्रशिक्षणाला योगेश खोब्रागडे यांनी मार्गदर्शन केले.