
नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली:जिल्हा परिषद एकोडी येथे पालक सभेचे आयोजन करण्यात आले. पालक सभेचे अध्यक्ष ग्रामपंचायत सरपंच संजय खोब्रागडे, प्रमुख उपस्थिती मध्ये उपसरपंच रिगण राऊत, ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले, वैभव खोब्रागडे, सुकराम बन्सोड, कुंदा जांभुळकर, रहिला कोचे, ज्योती मेश्राम विषयतज्ञ पंचायत समिती साकोली, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नरेश चौधरी, मुख्याध्यापिका छबिला गभने यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला.
सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, सरस्वती मातेच्या फोटो चे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
त्या नंतर शिक्षक व पाल्याच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली , व ग्रामपंचायत च्या वतीने शाळेमध्ये असलेल्या अडचणी लवकरच सोडविण्यात येतील अशी ग्रामपंचायत कमिटी ने सांगितले , या प्रसंगी मेश्राम मॅडम यांनी पालकांना मार्गदर्शन केले.पालक सभेत मध्ये 50 पालक उपस्थित होते.
पालक सभेचे संचालन गभने मॅडम तर आभार श्रीराम लांजेवार सर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमरलाल मरसकोल्हे सर, सुरेखा मेश्राम मॅडम, अंगणवाडी सेविका ,व्यवस्थापन समिती चे पदाधिकारी, माता पालक संघाचे पदाधिकारी व विध्यार्थी पालक यांनी सहकार्य केले.