डॉक्टर इरफान अहमद शेख यांचा राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्ताने आकाशझेप फाउंडेशनतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला.

कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

पारशिवनी:-डॉ. इरफान अहमद शेख यांचा राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्ताने आकाशझेप फाउंडेशनतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला.

       डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची राष्ट्रीय डॉक्टर दिन ही एक संधी आहे. हा दिवस सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना समर्पित आहे. लोकाचे रक्षण करण्यासाठी २४ तास काम करतात व त्यांची सेवा करतात त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यासाठी आकाशझेप फाऊंडेशनद्वारा पारशिवनी येथील सेवाभावी वृत्तीने वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. इरफान अहमद शेख यांचा राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्ताने गौरव करण्यात आला.

        डॉ. इरफान अहमद शेख यांचा आकाशझेप फाऊंडेशन अध्यक्ष प्रा. अरविंद दुनेदार व मार्गदर्शक गोपाल कडू यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ईश्वर खंगार, नरेंद्र देवगडे,खोब्रागडे आदी उपस्थित होते. डॉ. इरफान अहमद शेख यांनी कोरोनाच्या काळात केलेली रुग्ण सेवा ही कौतुकास्पद होती. त्यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेऊनच आकाशझेप फाऊंडेशनतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला.