करंजेकर पॉलिटेक्निक साकोली येथे द यूनीक अकॅडमी तर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन..

 

चेतक हत्तिमारे 

जिल्हा प्रतिनिधी

 

साकोली:- वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था नागपूर द्वारा संचालित ब्रह्मानंद करंजेकर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी साकोली येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले त्याप्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून इंजी संतोष शिरगावकर समन्वयक द यूनीक अकॅडमी पुणे शाखा नागपूर तर मार्गदर्शक म्हणून डॉ पितांबर उरकुडे नानाजी जोशी विद्यालय शहापुर भंडारा, संदीप वघमारे मार्केटिंग हेड द यूनीक अकॅडमी तर अध्यक्षस्थानी श्री. घनश्याम एस निखाडे प्राचार्य ब्रह्मानंद करंजेकर इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी साकोली हे होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांचे संस्थेच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 

प्रश्न मंजुषा मध्ये प्रथम आलेल्या भागश्री झोडे (डी एल एड द्वितीय वर्ष)चे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमा प्रसंगी मार्गदर्शना मध्ये – इंजी. संतोष देवगावकर यांनी सांगितले की

सर्वप्रथम, तयारी सुरू करताना नागरी सेवा परीक्षा, आयएएसचे ध्येय ठेवून अभ्यास सुरू केला पाहिजे. कारण नागरी सेवा परीक्षेचा अभ्यास विस्तृत व व्यापक आहे.

नागरी सेवा परीक्षा ही इतर सर्व परीक्षांमध्ये प्रमुख आणि काठिण्यपातळीत सर्वाधिक वरची मानली जाते. इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम यूपीएससीच्या जवळपास जाणारा असतो. हा अभ्यास चांगला झाला की इतर परीक्षांना तुम्ही सहज सामोरे जाऊ शकता. यूपीएससीची तयारी करताना सामान्य अध्ययनाचा पायाभूत अभ्यास चांगला झाल्यामुळे इतर परीक्षांना सामोरे जाण्यात विशेष अडचण येत नाही आणि नव्याने अभ्यासही करावा लागत नाही. इतर परीक्षांचा अभ्यासक्रम, परीक्षापद्धती, पॅटर्न यामध्ये काही अंशी फरक असतो, पण त्यासाठी तुम्हाला फार वेगळे आणि मोठे श्रम घ्यावे लागत नाहीत असे सांगितले .

डॉ पितांबर उरकुडे यांनी सांगितले अनेकवेळा एकाच परीक्षेचा ध्यास घेतल्याने उमेदवारांचे नुकसान होण्याची शक्यता असते. तीन चार प्रयत्न संपले तरी ऐन उमेदीची चार पाच वर्ष निघून जातात. म्हणून केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षांची नीट माहिती घेऊन उमेदवारांनी आपली योजना आखायला हवी. 

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य निखाडे यांनी महत्त्वाकांक्षा असणे वा ध्येयवादी असणे गैर बिल्कुल सुद्धा नाही, पण करिअरच्या वाटेवर नेमके काय साध्य करायचे आहे या विषयीची स्पष्टता व ते साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्नांची साथ असणे आवश्यक आहे असे सांगितले.

          कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा. प्रियांका भेंडारकर तर आभार प्रा. शैलेश फुंडे यांनी केला कार्यक्रमाचे आयोजनाकरिता , तोफेंद्र कोवे , पायल टेंभुर्णे ,सुनील बावनकर , सुहास वालदे, योगिनी बागडकर , मुकेश पारधी , अजय गायधने , दिपक लबाडे त्याचबरोबर विद्यार्थी प्रतिनिधी वेदांत मलेवार, सुप्रिया हरडे, क्रीश मोहबे, चांदणी चांदेवार, प्रतीक तोमर , भूपाली पटले , एकांश वाघाये यांनी सहकार्य केले..