
नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
‘साकोली :- महाराष्ट्रा मध्ये जे काही शासकिय पदभरतीची घोषणा झालेली आहे, त्यामध्ये वनरक्षक, तलाठी भरती, आरोग्य सेवा व इतर शासकिय पदभरतीचा समावेश आहे, यामध्ये शासनामार्फत 1000 ते 900 रू. परिक्षा शुल्क आकारण्यात आलेली आहे. गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून आहे. शासनाने द्वारे परीक्षा शुल्क कमी करून दयावी. बऱ्याच ग्रामीण भागातील शेतकरी व आर्थिक दुर्बल विद्यार्थी अवाढव्य शुल्क आकारणीमुळे शासकीय पदभरती पासून वंचित आहेत., राज्यातील सुरु असलेल्या पदभरती मधील आकरलेली शुल्क कमी करण्यात यावी. जेणे करून सर्व वर्गातील विद्यार्थी अर्ज सादर करू शकतील, आर्थिक अडचणी त्यांना भासणार नाही,काही विध्यार्थी स्वता दुसऱ्या च्या कामावर जाऊन आपलं शिक्षण पूर्ण करत आहे. काही रोजगार आहेत.अश्या विद्यार्थी नी काय करावं. घरून पैसे मागितला कि घरची परिस्थिती नाजूक आहे. असा सवाल शासनाला युवावर्गानी केला आहे.या मध्ये आस्क अकॅडमि चे संचालक आशिष नंदेश्वर, आणि फिडम युवा फॉउंडेशन किशोर बावणे यांनी शासनाला विनंती केली आहे कि त्यांनी यावर लक्ष करुन गरीब मुलावर न्याय करावं.