नंदीगाव येथील शाळेत नवागताचे उत्सवात स्वागत… — माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या प्रमुख उपस्थित!!

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

अहेरी : तालुक्यातील नंदीगाव येथील शाळेत विद्यार्थ्यांच पहिला दिवस नवागता प्रवेश केलेल्या इयत्ता १ ली च्या विद्यार्थ्यांचा स्वागत उत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंदिगावं येथे विद्यार्थ्यांचे स्वागत आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे युवा नेते, लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

       यावेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,उपसरपंच हरीश गावडे,संदीप दुर्गे,नरेंद्र गर्गम,अंगणवाडी सेविका पांडे मॅडम,अंगणवाडी मदतनिस,लक्ष्मण आत्राम,राकेश सडमेक,चिंटू पेंदाम,प्रकाश दुर्गे,कैलाश दुर्गेसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.