कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी:-तारीख :- ३०-०६-२०२३ ला पारशिवनी येथिल सर्वोदय शिक्षण मंडळ व्दारे संचालित केसरीमल पालीवाल स्कूल आणि कनिष्ठ
महाविद्यालय पारशिवनी येथील प्राचार्या सौ प्रभावती कोलले मॅडम हे आज दि- 30-06-2023 ला सेवा निवृत्त झाल्या. या बदल निरोप समारोह शाळेतील सभागृहात संपन्न झाला. प्राचार्या प्रभावती कोलते यांनी आपल्या आयुष्यातील 32 वर्षाची सेवा पालीवाल विद्यालयाला दिली. शाळेतील शिक्षीका,पर्यवेक्षिका, उपमुख्याद्यापीका व नंतर मुख्याद्या पिका या पदावरून असी पदोन्नती करून सेवानिवृत्त झाल्या. निरोप समारंभात सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव दिपकबाबू पालिवाल यांनी शाल श्रीफळ देवून पुढील आयुष्या- करिता शुभेच्या दिल्या. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष कस्तूरचंद पालीवाल, संचालिका पुष्पा पालीवाल, उपमुख्याद्यापीका सौ हिमांगी पोटभरे पर्यवेक्षिका सौ. चित्रा कहाले, व विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. निरोप समारंभात मान्यावर व शिक्षका च्या हस्ते भेटवस्त प्रदान केले तसेच सर्वानी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दामोधर चूटे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन शंभरकर यांनी केले.