नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली :जिल्हा परिषद हायस्कूल एकोडी येथे आज नवगतांचे स्वागत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या माहेश्वरी नेवारे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निकेत खेडीकर, ग्रामपंचायत सदस्य, तथा शाळा व्यवस्थापन सदस्य भावेश कोटांगले, शाळा समिती सदस्य ,शाळा समिती सदस्य नरेश चौधरी, मुख्याध्यापक विलास लांजेवार सर, उपस्थित होते.
या प्रसंगी ५ ते ८ वर्गातील मूला मुलींना गणवेश वाटप व पुस्तक वाटप करण्यात आले. व सर्व विद्यार्थाना गोड जेवण देण्यात आले.
त्यावेळी भावेश कोटांगले यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शाळेच्या पहिल्या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
माहेश्वरी नेवारे यांनी उपस्थित विध्यार्थ्यांना महापुरुषांचे विचार व शाळेच्या पहिल्या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या दररोज अभ्यास करून आपले भविष्य उज्ज्वल करावे अशी मत मांडली.
कार्यक्रमाचे संचालन कैलास खोब्रागडे सर तर आभार संध्या साखरे मॅडम यांनी केले.
कार्यक्रम प्रसंगी, प्रा.निलेश चोले, प्रा.विनोद ढोणे, सुधाकर ढोणे,कुठारे मॅडम,तिडके मॅडम,बन्सोड मॅडम तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.