दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : तीन वर्षांपासून मेट्रो आणि उड्डाणपुलाच्या कामामुळे एसएनडीटी कॉलेज समोरील बस स्टॉप नव्हता अनेक नागरिक व विद्यार्थिनींना बस पकडण्यासाठी अर्धा किलोमीटर पौड फाटा या ठिकाणी जावे लागत होते. वारजेला बस प्रवास करायचा असेल तर दशभुजा गणपती मंदिरानंतर यात्री हॉटेल पर्यंत पायी जावे लागत होते, ज्यांना पौडला जायचे आहे त्यांना सलग उड्डाणपुलाच्या आधी सोनल हॉल पर्यंत पायी जावे लागत होते. जवळपास दररोज नागरिकांना व विद्यार्थ्यांना सकाळ संध्याकाळ एक किलोमीटर चालावे लागत होते.
यासाठी अनेकदा पाठपुरावा करूनही नागरिकांची व विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण होत नव्हती परंतु आम आदमी पार्टी प्रवासी आघाडीचे चेथिल अय्यर, निलेश वांजळे व सहकारी यांना याबाबतीत सांगितले असता त्यांनी त्वरित पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड यांच्याकडे याबाबतीत पाठपुरावा केला.
पीएमपीएमएल चे अध्यक्ष ओम प्रकाश बकोरिया, नारायण करडे वाहतूक आणि मार्ग प्रभारी निरंजन तुळपुळे, या अधिकाऱ्यांना बस स्थानकाची अंमलबजावणी करा हे सांगण्यात आले त्यावर अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली. अखेर आम आदमी पार्टी च्या लढ्याला यश मिळाले.
या ठिकाणी विद्यार्थिनींच्या हस्ते याचे यावेळी उद्घाटन करण्यात आले.सर्व पीएमपीएमएल अधिकाऱ्यांचे आभार मानले. नागरिकांनी यावेळी सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले या प्रसंगी एसएनडीटी शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील, संगीता गांगुर्डे, चेंथिल अय्यर, निलेश वांजळे, अभिजीत परदेशी, राजू परदेशी, साहिल परदेशी, सुरेखाताई भोसले, रोहन रोकडे, नागरिक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.