आषाढी एकादशीनिमित्त माऊली मंदिरात भाविकांना राहुल चव्हाण परिवाराकडून खिचडीचे वाटप.

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

आळंदी : देवशयनी आषाढी एकादशी निमित्त येतील युवा कार्यकर्ते राहुल चव्हाण परिवाराकडून माऊलींच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सुमारे 50 किलो तयार खिचडीचे वाटप करण्यात आले.

राहुल चव्हाण हे अतिशय दानशूर व्यक्तिमत्व असून आषाढी, कार्तिकी, महाशिवरात्र व इतर दिवशी भाविकांना महाप्रसाद खिचडी चहा पान मसाले दूध राजगिऱ्याचे लाडू केळी व इतर उपवासाच्या वस्तू ह्या वेळोवेळी भाविकांना दिल्या जातात.

आज खिचडी वाटप दरम्यान आळंदी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदकुमार वडगावकर, साईनाथ ताम्हणे, हिरामण तळेकर, विनोद गायकवाड, मयूर कुऱ्हाडे, उदय महाराज अडवळे, शुभम ताम्हणे, पंकज पाखरे, अविनाश राळे, दिनेश कुऱ्हाडे, अनिल जोगदंड, ज्ञानेश्वर घुंडरे, अर्जुन मेदनकर, बाबुराव मोरे, महादेव पाखरे, सचिन शिंदे व वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी या खिचडी वाटप कार्यक्रमात सहभागी झाले होते.

खिचडी वाटपानंतर सर्वांनी माऊलींच्या संजीवन समाधीचे मनोभावे दर्शन घेतले आळंदी देवस्थानच्या सुरक्षारक्षकांनी मोलाचे सहकार्य यावेळी केले.