देसाईगंज रेल्वे स्थानकाच्या आधूनिकीकरणाचे काम सुरू… — आप च्या प्रयत्नांना मिळाले यश…

 

पंकज चहांदे

दखल न्यूज भारत

   देसाईगंज

       गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव असलेल्या देसाईगंज रेल्वेस्टेशनचे सुशोभीकरण करण्याची मागणी आम आदमी पार्टीने डीआरएमकडे केली होती. या मागणीला अखेर यश आले असून सुशोभिकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. येत्या काही दिवसात देसाईगंज येथील रेल्वे स्टेशन चकाचक दिसून येणार आहे.

      गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज रेल्वेस्टेशनवरून शेकडो लोक रेल्वेने प्रवास करतात. मात्र, या रेल्वे स्टेशनवर सुविधा नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता, आम आदमी पार्टीच्या वतीने अनेकदा देसाईगंज रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण करण्याची मागणी स्टेशन मास्टरमार्फत डीआरएमकडे केली होती. अखेर या प्रयत्नाला यश आले असून रेल्वेस्थानकाच्या सुशोभिकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. 

ह्या मिळणार सुविधा

पहिल्या टप्यात तिकीट घराच्या मागील भागाचे सुशोभीकरण, पार्किंगची सोय, दुसऱ्या टप्यात दोन्ही भाग जोडण्यासाठी मोठा पूल, प्लॅटफॉर्म अपग्रेडेशन, डिजिटल घड्याळ, पाण्याची व्यवस्था करणार आहे. तसेच कुलर, एअर कंडिशनर, प्रवासी प्रतीक्षालय व स्वच्छतागृहांचे आधुनिकीकरण, रेल्वेला जाणाऱ्या प्रवाशांची मुख्य प्रवेशिका बसस्थानकाच्या समोरील बाजूने करण्यात येणार आहे. लिफ्ट सुविधा, स्वयंचलित सिद्दिया, रेल्वे स्थानकावर येण्याची व जाण्याची स्वतंत्र सोय विमानतळासारखी असेल अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.