वाघोडा येथे कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत कापूस पीक उत्पादन वाढ व तंत्रज्ञान या बाबत करण्यात आले मार्गदर्शन. 

 

     कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

 

पारशिवनी :- पारशिवनी तालुक्यातील मौजा वाघोडा येथे कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत कृषी विभागामार्फत सभा आयोजित करण्यात आली होती.सभे मध्ये कापूस पीक उत्पादन वाढ व तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

        तसेच तूर पिकावरील मार रोगाचे प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उपाय योजना सांगण्यात आल्या.पुरुष शेतकऱ्यांचे शेतकरी गट तयार करून विविध योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

          कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती सगण्यात आली..त्यात पंतप्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या बाबद महिती देण्यात आली..

        कृषी यांत्रिककरण,मनरेगा रुक्ष लागवड pm kisan Ekyc बाबद माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष वाघोडा गावचे उपसरपंच श्री विलासराव गिऱ्हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी पर्यवेक्षक श्री.पी.सी. झेलगोंदे हे होते.कार्यक्रमाचे आयोजन कृषी सहाय्यक श्री आर.डी. सोरमारे यांनी केले. 

              सभे करिता गावातील प्रगतशील गोविंदराव चौधरी,पंकजराव चौधरी तसेच महीला बचत गटातील महिला व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.