दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : येथील पुणे जिल्ह्याचे काॅंग्रेसचे नेते संदीप नाईकरे पाटील यांच्या मातोश्री वैजयंती नाईकरे पाटील यांच्या निधनामुळे मध्यप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी नाईकरे पाटील यांच्या घरी जाऊन प्रा.सुभाष नाईकरे पाटील सर, संदीप नाईकरे पाटील व कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील.
दिग्विजय सिंग हे सातत्याने गेली ३१ वर्षापासून आळंदीत आषाढी वारीला दशमीला माऊलींच्या दर्शनासाठी येत असतात, यावेळी आळंदीत आल्यावर काॅंग्रेसचे नेते संदीप नाईकरे पाटील यांच्या मातोश्रीचे निधन झाले असल्याचे त्यांना समजले यांचे माऊलींच्या प्रस्थान दिवशीच आळंदीत दुःखद एक निधन झाले, या गोष्टीची माहिती कळताच दिग्विजय सिंग यांनी काॅंग्रेसच्या कोणत्याही पदावर नसताना पण पक्षनिष्ठ म्हणून आपल्या कार्यकर्तावर कोसळलेले दुःखात सांत्वन नाईकरे पाटील यांच्या घरी भेट दिली.
त्यावेळी महाराष्ट्र काॅंग्रेसचे सरचिटणीस यशवंत हाप्पे, अभयजी छाजेड, नंदकुमार वडगावकर, ॲड.विष्णू तापकीर, रविंद्र रावडे ,प्रसाद बोराटे, एम.डि.पाखरे, ज्ञानेश्वर कु-हाडे, राहुल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.