कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी:-
मौजा साटक येथे कृषी संजीवनी सप्ताहच्या पहिल्या दिवसी कृषी तंत्रज्ञान व प्रसार दिवस निमित्ताने शेतकरी सभा घेण्यात आली.
यावेळी सदर सभेमध्ये भात पिकामधील करपा,कडा करपा तसेच इतर रोग कारक बुरशी तसेच किडींच्या व्यवस्थापन साठी 3 टक्के मिठाच्या बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक घेऊन लवकर येणाऱ्या वाणाची निवड तसेच भात पिक लागवडीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
त्यानंतर तुर बियाणे मिनीकिट वाटप करून तुरीसाठी थायरम तसेच ट्रायकोडर्माच्या बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक घेऊन त्यावरील कीड व रोग नियंत्रणाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले .
तसेच यावेळी कृषी विभागातील आत्मा अंतर्गत बनवण्यात आलेल्या महिला शेतकरी स्वयंसहायता गटाचे सबलीकरण व त्यांना कृषी विभागाच्या विविध योजनेसाठी अर्ज करून लाभ घेण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले त्यानंतर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील प्रलंबित इ- के.वाय.सी करण्याबद्दल शेतकऱ्यांना सांगण्यात आले.
सदर सभेमध्ये कृषी पर्यवेक्षक पी.डी शिरपूरकर ,कृषी पर्यवेक्षक एस पी कुबडे,कृषी सहाय्यक के. बी.ठोंबरे तसेच महिला शेतकरी उपस्थित होत्या.