“ कुर्माघर” चित्रपटाच्या निर्मात्या व अभिनेत्री तृप्ती भोईर यांनी घेतले आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचे ऑडिशन…

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

गडचिरोली जिल्हा हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये बहुतांश आदिवासी बांधव हे दुर्गम-अतिदुर्गम भागात राहत असून जुन्या रुढीपरंपरेने ते वर्षानुवर्षे आपले जीवनमान जगत आले आहेत. त्यामध्ये एक अशी परंपरा आहे की, मासीक पाळीच्या दिवसात या भागातील महिलांना घराच्या आत न राहता बाहेर एक छोटे घर बनवलेले असते त्यात राहावे लागते, त्याला कुर्माघर असे म्हणतात.

      त्यावर आधारित “कुर्माघर” नामक चित्रपटाची निर्मीती करण्यात येत असल्याने अगडबम, टुरिंग टॉकीज, नमस्कार जयहिंद, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवे अशा अनेक उत्कृष्ट चित्रपटाच्या निर्मात्या तृप्ती भोईर व विशाल कपुर यांनी नक्षलवादाचा कठोर मार्ग सोडुन गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलेल्या आत्मसमर्पितांच्या नवजीवन वसाहत येथे आज दिनांक २४/०६/२०२३ रोजी जावून विविध पुरुष तसेच महिला आत्मसमर्पित सदस्यांचे चित्रपटाच्या निर्मितीसाठी ऑडिशन घेतले. त्यामध्ये त्यांनी त्यांचे आवाजाचे परिक्षण व मार्गदर्शन केले.

        भविष्यामध्ये आत्मसमर्पित सदस्यांना चित्रपट सृष्टित काम करण्याची संधी मिळावी यादृष्टीने पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. (भापोसे) यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पीत नक्षल सदस्यांनी चित्रपटात काम करावे व स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच ऑडीशन दरम्यान अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. तसेच आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि सागर झाडे व अंमलदार हे उपस्थित होते.