अश्विन बोदेले
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
आरमोरी:- तालुक्यातील डार्ली येथे बारमाही सिंचनाची सोय नसल्यामुळे शासनाच्या वतीने विविध संस्थांच्या माध्यमातून गाव तलावाच्या खोलीकरणाची कामे हाती घेतली आहे. त्यानुसार डार्ली येथे निसर्ग संरक्षण संस्थेच्या वतीने डार्ली येथील ग्राम वन व्यवस्थापन समितीला 2 लाख 50 हजार रुपये अनुदान मंजूर झाले.
सदर अनुदानाच्या माध्यमातून तलाव खोलीकरणाचे काम 18 जून रोजी सुरू झाले. तलाव खोली करण्याचा शुभारंभ पोलीस उपनिरीक्षक टिकाराम लाकडे यांच्या हस्ते झाला.
यावेळी दिलीप नवघरे, ईश्वर लाकडे, प्रभाकर गेडाम, दिवाकर कुंभरे, संतोष लाकडे, बालाजी कुडुमते, बाळू सडमाके, उत्तरा ठाकूर , आशा धूर्वे आदी उपस्थित होते.
तलाव खोलीकरणामुळे पाणी साठवणूक क्षमता वाढून शेतकऱ्यांना सिंचनासाठी फायदा होईल. अशी आशा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.