डॉ.जगदीश वेन्नम
संपादक
गडचिरोली, दि. २३ : सेवा फाउंडेशन नागपुर यांनी जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथक डापकु सामान्य रुगणालय, गडचिरोली यांच्या सयुंक्त विद्यमानाने “Education Spreads Smile ” या उपक्रमा अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. सतिशकुमार सोळंके यांच्या मार्गदर्शनाने एआरटी सेन्टर सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दुर्धर आजारानी बाधीत परिवारातील ३१ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता डॉ. धुर्वे बाहय सपंर्क निवासी वैद्यकिय अधिकारी, डॉ. रोकडे रक्तसंक्रमण अधिकारी, श्री महेश भांडेकर जिल्हा कार्यक्रम अधिकारी, डॉ. अभिषेक गव्हारे क्लिनिकल सर्वीसेस ऑफिसर डापकु सामान्य रुग्णालय गडचिरोली, कु. प्रणाली पाठक, श्री राहुल काकडे, आयुष चांभरे, राज खंदारे सेवा फाउंडेशन नागपुर व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थे अतंर्गत सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.