नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली -प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटना साकोली च्या वतीने 26 जून राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती साकोली येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कलावंतांची संघटना सुद्धा सामाजिक कार्यात अग्रेसर आहे आपली एक सामाजिक जिम्मेदारी समजून रक्तदान करू गरजूवंतांना जीवनदान देऊ या साठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
रक्तदान शिबिराचे उदघाटक उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले साहेब ,अध्यक्ष तहसीलदार साकोली निलेश कदम साहेब, प्रमुख उपस्थिती मध्ये समाजकल्याण सभापती मदनभाऊ रामटेके, संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष राष्ट्रीय प्रबोधनकार अनिरुद्धजी शेवाळे, जिल्हा परिषद सदस्या सौ.माहेश्वरी नेवारे, सभापती प.स.साकोली गणेशजी आदे, साकोली पोलीस निरीक्षक राजेश थोरात साहेब, वैद्यकीय अधिक्षक डॉ.संदीप गजभिये, सौ.इंद्रायणी कापगते महिला समुपदेशन केंद्र साकोली, म.भूमालाताई कुंभरे जेष्ठ नाट्य कलावन्त माजी जी .प. सदस्य, संघटनेचे केंद्रीय महासचिव सुभाष कोठारे, केंद्रीय महासचिव मनोजभाऊ कोटांगले, संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भावेश कोटांगले, जिल्हा महासचिव राकेश वालदे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती अध्यक्ष दिपक साखरे ,उपाध्यक्ष अशोक रंगारी,सचिव ऍड स्मिता मेश्राम, सहसचिव हरीभाऊ शहारे, प्रमोद शिंगाडे ,अमोल टेम्भुरने, जयंत देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडेल.
या साठी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी आपली नावे संघटनेच्या पदाधिकारी भावेश कोटांगले , प्रियंका गायधने, प्रतिमा साखरे, अर्चना कान्हेकर, दीपाली यावलकर,संजय टेम्भुरने, मनोहर गंथाळे, धनंजय धकाते,संदीप नागदेवे, रोहित मांढरे,दिनेश टेंम्बरे,अरविंद कांबळे, अरविंद शिवणकर, यशवन्त बागडे, बालू भुजाडे, सोनू मेश्राम,ईश्वर धकाते, धम्मा वासनिक,निलाराम बागडे, मनोज बोपचे,पुण्यशील कोचे, राहुल कापगते, संदीप कोटांगले,सोनू लाडे, गुड्डू बोरकर, यांचे कडे नावे नोंदवावी असे संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भावेश कोटांगले यांनी केले आहे.