वादळी वाऱ्यामुळे साखरी येथील दोन शेतकऱ्यांचे सौर ऊर्जा पॅनलचे नुकसान…

 

युवराज डोंगरे/खल्लार

    उपसंपादक

     खल्लारनजिकच्या साखरी येथे दि 15 जूनला रात्रीच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह आलेल्या पावासामुळे दोन शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या सौर ऊर्जा पॅनलचे मोठे नुकसान झाले आहे.

       साखरी येथील अभिषेक विनोद नवरंगे यांच्या शेतातील सौरऊर्जा पॅनलच्या तीन प्लेटा उडून गेल्या तर मारोती उत्तमराव नवरंगे या शेतकऱ्याच्या शेतातील पूर्णच सौरऊर्जा पॅनलच जमिनीपासून उखडून गेले आहे. त्यामुळे या दोन शेतकऱ्यांच्या शेतातील सौरउर्जा पॅनलचे वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन्ही शेतकऱ्यांच्या शेतातील झालेल्या सौरऊर्जा पॅनलची नुकसानभरपाई त्यांना देण्यात यावी अशी मागणी या दोन्ही शेतकऱ्यांनी केली आहे.

      सदर सौरऊर्जा पॅनलची ही वॉरंटी 25 वर्षाची असल्याचे या दोन्ही शेतकऱ्यांनी सांगतले आहे.त्यांना त्यांच्या शेतात बसविलेल्या सौरऊर्जा पॅनलची नुकसानभरपाई कंपनीतर्फे देण्यात यावी अशी मागणी या दोन्ही शेतकऱ्यांनी केली आहे.