डॉ.जगदिश वेन्नम
संपादक
अहेरी:-तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ठ पुसुकपल्ली येथील पूजेसाठी माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याकडून आर्थिक मदत करण्यात आली.
पुसुकपल्ली गावात दरवर्षी पावसाळ्यापूर्वी येथील शेतकरी विविध पूजेचे आयोजन करतात.सध्या या ठिकाणी गाव बांधणी तसेच विधिवत पूजेचे आयोजन करण्यात आले आहे.या पूजेसाठी मोठा खर्च येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य मलरेड्डी येमनूरवार यांनी भाग्यश्री ताई आत्राम यांना दिली.लगेच ताईंनी गावातील शेतकऱ्यांशी चर्चा करून पूजेसाठी मोठी आर्थिक मदत केली.
पुसुकपल्ली गावातील शेतकऱ्यांना पूजेसाठी आर्थिक मदत मिळाल्याने त्यांनी ताईंचे आभार मानले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते मलरेड्डी येमनूरवार,पुसुकपल्ली गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.