कैलास गजबे- करजगाव
मुंबई येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहातील हत्याकांडाची सखोल चौकशी करण्याची मागणी…
वंचित बहुजन युवा आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्ष परमेश्वर रणशूर तथा वार्ड अध्यक्ष गौतम हराळ यांच्या वर प्राणघातक हल्ला करणार्यांवर कठोर कार्यवाही कारणाची मागणी..
बोंढारा जिल्हा नांदेड येथील अक्षय भालेराव यांची जातीयवादी मानसिकतेच्या समूहाकडून निघृर्ण हत्या करण्यात आली होती परमेश्वर रणशूर, गौतम हराळ यांच्या वर केलेला प्राणघातक हल्ला व मुंबई येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात तरुणीचे घडलेले हत्याकांड या पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणाऱ्या घटना असून या तिन्ही घटनेचा आज वंचित बहुजन युवा आघाडी चांदूर बाजार तालुक्याच्या वतीने निषेध करण्यात आला असून मागण्यांचे निवेदन आज दिनांक ०९/०६/२०२३ रोजी तहसील कार्यालय मार्फत गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आले आहे निवेदन सादर करते वेळी सुरज चव्हाण, चेतन तायडे, बुद्धभूषण तागडे, अमरदिप गवई, विनोद खडसे, रोहित खडसे, अॅड अंकुश तागडे, संतोष तायडे,रत्नदीप रायबोले, अ तन्वीर अ बशीर, रमेश तंतरपाडे, आदी उपस्थित होते.