दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त आरोग्य विभाग सज्ज झाला असून उत्तम व व्यवस्थित आरोग्य सुविधा वारकऱ्यांना दिल्या जाणार आहेत, त्या अनुषंगाने आळंदीत विविध ठिकाणी आरोग्य बुथ उभारण्यात आले आहे असे आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.उर्मिला शिंदे यांनी सांगितले आहे.
वारकऱ्यांना आरोग्याच्या दृष्टीने प्रबोधनासाठी आळंदी शहरात आरोग्य दिंडीचे आयोजन करण्यात आले असून उद्या दि.10 जून रोजी ग्रामीण रुग्णालय येथून आरोग्य दिंडी निघणार आहे. आरोग्य दिंडीचा मार्ग ग्रामीण रुग्णालय,पोलिस स्टेशन,माऊली मंदिर,भक्त निवास समोरून वडगाव चौक ते ग्रामीण रुग्णालय आळंदी असा असणार आहे.
पालखी सोहळ्यात आरोग्य विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सुविधेचा आरोग्य सेवा मंडळ पुणे उपसंचालक डॉ.राधाकिशन पवार यांनी ग्रामीण रुग्णालय आळंदी येथे भेट देऊन नियोजनाची पाहणी केली तसेच बुथवर भेट देऊन आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून सूचना केल्या तसेच मार्गदर्शन केले.
यावेळी पालखीतील वारकरी संख्या व त्यानुसार आरोग्य मनुष्य बळ, उष्माघात, जलजन्य आजार, कीटकजन्य आजार, हिरकणी कक्ष, खाजगी रुग्णालय बेड आरक्षण, रुग्णवाहिका व्यवस्था, आरोग्यदूत, फिरता दवाखाना, 10 पालखी मुक्कामाच्या ठिकाणच्या सुविधा या बाबत आळंदी देवस्थानशी चर्चा झाली. यावेळी व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, रुग्ण कल्याण समिती सदस्य डी डी भोसले पाटील, ग्रामीण रुग्णालय आळंदी येथील वैदयकीय अधिक्षक डॉ ऊर्मिला शिंदे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ इंदिरा पारखे, क.लिपिक कविता भालचीम,विस्तार अधिकारी श्री.महांकाले,श्री.आढाव,श्री. कुलकर्णी,श्रीमती देशमाने उपस्थित होते.