मौजा केडमारा जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमकीत झालेल्या मृत्यूंची शोध मोहिम संबधाने अधिक माहिती देण्याचे आवाहन..

 

डॉ.जगदिश वेन्नम

     संपादक 

   

गडचिरोली, (जिमाका) दि.07 : मौजा- केडमारा जंगल परिसरात, पोलीस मदत केंद्र ताडगाव, जंगल परिसरात दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी झालेल्या पोलीस – नक्षल चकमकीदरम्यान तीन पुरुष मृतदेह सापडल्याचे आदेशात नमूद आहे. 

        सदर घटनेतील मृतपावलेल्या व्यक्तींच्या मृतदेहातंर्गत मृत्यूच्या कारणांचा शोध लावणे आवश्यक असल्याने, सदर प्रकरणात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 176 अन्वये दंडाधिकारी चौकशी करावयाची आहे.

       तरी जाहीररित्या सुचीत करण्यात येते की,या घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी पुढील मुद्यांना अनुसरुन आपले लेखी निवेदन शपथपत्रासह उपविभागीय दंडाधिकारी, एटापल्ली येथील यांचे न्यायालयात जाहीर सूचना प्रसिद्धी झाल्यापासून 15 दिवसाचे आत किंवा तत्पूर्वी कार्यालयीन वेळेत सादर करावीत असे उपविभागीय दंडाअधिकारी, एटापल्ली शुभम गुप्ता यांनी कळविले आहे. 

       चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी पुढील मुद्यांना अनुसरुन लेखी निवेदन द्यावे. घटनेचे आपण पाहिल्याप्रमाणे वर्णन,आपला या घटने विषयीचा अनुभव, घटनेनंतर किंवा आधी या घटनेशी काही घटना घडली असल्यास त्या विषयी माहिती सरकारी किंवा अन्य यंत्रणेच्या प्रतिक्रिया किंवा सहभाग यांच्या विषयी आपले म्हणणे, या घटनेशी संबंधित इतर कोणतीही माहिती देण्यास अवगत करण्यात येत आहे.