कर्मयोगी संत गाडगे महाराजांच्या जन्मभूमीतच पेटले पाणी..  – ४० घरच्या महिलांचे पाण्यासाठी ठिय्या आंदोलन…

 

युवराज डोंगरे

 उपसंपादक

शेडगाव वरुन:-

     संत गाडगे महाराज यांचे जन्मभूमी असलेल्या शेडगाव या गावातच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटलेला असून पाण्यासाठी सदर गावातील महिलांना वनवन भटकंती करावी लागत आहे.यामुळे तेथील महिलांनी पाण्यासाठी ठिय्या आंदोलन केले आहे.

        दलित वस्तीचे ४० घर असलेल्या नागरिकांपुढे पाण्याचा ज्वलंत प्रश्न आवासुन उभा ठाकला असून पाणी मिळणार काय?या विवंचनेत ते आहेत.

          तद्वतच पाण्याच्या प्रश्नामुळे हवालदिल झाले असल्याने संत गाडगे महाराज यांच्या दशसूत्री या कामांतर्गत तहानलेल्या पाणी देणे हेच परम कर्तव्य ठरायला पाहिजे.मात्र या गावांमध्ये आज दशसुत्री कुचकामी ठरते आहे.

        गेली तीन वर्षापासून जिथे दलित आणि बहुजन समाज राहतो तो ४० घरांचा एक भाग हा पाण्यापासून सातत्याने वंचित ठेवल्या जातो आहे.कारण तेथे पाणी चढत नाही.

      परंतु ज्या संत गाडगेबाबांनी तहानलेल्या पाणी हा मूलमंत्र दिला त्याच गावात जर अशी पाण्यासाठी वाणवा लागत असेल तर मग शासनाचा आणि प्रशासनाचा काय अर्थ ?अशी चर्चा सर्वत्र गावामध्ये पसरलेली आहे.

      उर्वरित गावात भरपूर पाणी येत असून लोक येथेच्छ उपभोग कूलर ,संडास ,बाहेर पाणी शिंपणे यामध्ये करताना दिसत आहेत.मात्र,या ४० घरांना पिण्याचे पाणी हे मिळेल की नाही असे झालेले आहे.

***

बाटम..

👇👇

       ” पाण्याचा वाद हा फक्त उंचीवर असलेल्या घरांसाठी आहे. तिथे पाणी पोहोचत नाही याबाबतीत जीवन महाराष्ट्र प्राधिकरणाचे प्रभारी सुपरवायझर पोटे यांच्याशी चर्चा करून त्वरित पाईपला जॉईंट मारून पाणी हे प्रत्येकाच्या घरापर्यंत जाईल अशी व्यवस्था करून देण्याची विनंती संबंधितांना केली आहे.

       संत गाडगे महाराजांचे हे गाव.या गावातील नागरिकांना पाण्यासाठी जर महिलांना आंदोलन करावा लागते यापेक्षा खेदाची कोणतीही बाब असू शकत नाही.”

               गोपाल गावणेर

             ग्रामसेवक शेंडगाव 

***

बाटम..

  👇👇

      ” गेली तीन वर्ष हा ४० घरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता.परंतु आता हा मुद्दा ऐरणीवर आला असता मी आणि गावचे काही सहकारी यांनी मिळून आजच्या आज हा प्रश्न एकदाचा निकाली काढणार आहे.कारण उंचीवर असलेले घरांना पाण्याची प्रेशर हे मिळत नाही म्हणून पाणी पोहोचत नाही. त्यामुळे आजच्या आज हा सगळा विषय मार्गी लागून प्रत्येकाला पाणी मिळेल अशी व्यवस्था करून देतो.”

                  दिलीप पोटे

     प्रभारी सुपरवायझर म.जि.प्रा.