चिमूर प्रतिनिधी
समाजसेवा हीच ईश्वरसेवा, असे म्हंटले जाते. भारतीय संस्कृतीत परोपकार, समाजसेवा, लोककल्याण या भावनांना अनन्यसाधारण महत्व आहे.गरजूना मदतीचा हात देणारे अनेक मान्यवर आजही समाजात आहेत, म्हणून माणुसकी टिकून आहे. समाजसेवेचा उपक्रम समजून आ. बंटी भांगडिया यांच्या नेतृत्वात काम करणारे कार्यकर्ते व भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मनीष तुम्पल्लीवार यांनी 31 मे रोजी कु. देवयानी नितीन गभने या बालिकेच्या नावे 50 हजार रु. ची एफ. डी. ( फिक्स डिपॉजिट ) कन्यका नागरी सहकारी बँक चिमूर येथे काढली. सदर एफ. डी. पावती आ. बंटी भांगडिया यांच्या उपस्थितीत मनीष तुम्पल्लीवर यांनी श्री विठ्ठल – रुखमाई जिनिंग भिसी येथे 1 जून रोजी रात्री आठ वाजता देवयानी गभनेचे काका निलेश गभने यांच्या सुपूर्द केली. जेव्हा देवयानी विवाहयोग्य होईल तेव्हा तिला सदर एफ. डी. च्या मॅच्युरिटीचे जवळपास पाच लक्ष रु.मिळतील. ही रक्कम देवयानीच्या भविष्यासाठी मोलाची ठरणार आहे.
कु. देवयानी ही भिसी येथील प्रसिद्ध सामाजिक व राजकीय कार्यकर्ते दिवंगत नितीन गभने यांची एकुलती एक मुलगी आहे. कोरोनामुळे नितीन गभने यांचे अकाली निधन झाले. देवयानीचे पितृछत्र हरपले. नितीन गभने भारतीय जनता पार्टीचे भिसी – आंबोली जिल्हा परिषद सर्कल प्रमुख होते. त्यामुळे नितीन गभने यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाची काळजी भाजपा परिवार घेत आहे.सामाजिक दायित्व व राजकीय कर्तव्य भावनेतून मनीष तुम्पल्लीवर यांनी कु. देवयानी गभने या बालिकेला केलेली मदत खरोखर प्रसंशनीय आहे.
कार्यकर्त्यांसाठी कोंबडा- बकरा व दारुवर खर्च न करता आपल्यातल्या गरजू व्यक्तींना मदतीचा हातभार दिला पाहिजे, असा संदेश या माध्यमातून मनीष तुम्पल्लीवर यांनी समाजाला दिला, अशी प्रतिक्रिया याप्रसंगी बोलतांना आ. भांगडिया यांनी दिली. याप्रसंगी भाजपा नेते गोपाल बलदुवा, मनीष तुमपल्लीवार, समीर राचलवार, एकनाथ थुटे, संजय नवघडे, बालू पिसे, किशोर मुंगले, बंटी वनकर, निलेश गभने, लीलाधर बन्सोड, किशोर नेरलवार, रवी लोहकरे, अमित जुमडे, रोशन बन्सोड, भूषण सातपुते, गोलू मालोडे, मधू झाडे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.