युवराज डोंगरे/खल्लार
श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय विहिगाव चा वर्ग 10 वी चा निकाल याही वर्षी उत्कृष्ट लागला आहे.
परीक्षेला एकूण 63 विद्यार्थी बसले होते.त्यापैकी 62 विद्यार्थी पास झाले.निकालाची टक्केवारी 98.41 एवढी आहे.
63 विद्यार्थ्यां पैकी 19 विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत ,26 विद्यार्थी प्रथम श्रेणीत व 17 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालीत.
या वर्षी कू.वैष्णवी विनोद चौरागडे हिने 88.80 % गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला.
द्वितीय क्रमांक कु खुशी अशोक वऱ्हेकर 86.20%,
आणि तृतीय क्रमांक कु.गौरी सुनील भांबुरकर 85% हिने पटकावला.
तसेच तन्मय अरविंद बोरोळे 84.20%, विशाखा हिम्मतराव अभ्यंकर 84.% , जय मानकर 82.80%,वेदांती रावसाहेब पखान 81.60%, सुजल संजय भांबुरकर 80.60%,सार्थक धनोकर 80.40%,कार्तिक रोही 80.20%,अमृता पिंपळे 79.60%,खुशी भांबुरकर 78.80%,मंथन भेलकर 78.80%, अनुश्री बागले 78.20%,सिद्धेश चौरागडे 77%, कार्तिक भेलकर 76.80%,वेदांत सावरकर 76.60%,वेदिका चौरागडे 76% ,ईश्वरी राऊत 75.80 हे विद्यार्थी सुध्दा प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेत. व यशाची परंपरा कायम राखली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्षा किर्तीताई अर्जुन,सचिव श्री राव सर, प्रशासन अधिकारी श्री पंडित सर,संस्थापक अध्यक्ष कमलताई गवई, शाळा निरीक्षक निलेश देशमुख , विद्यालयाचे प्राचार्य अशोक मसने व सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.