कोरची तालुक्यातील मुलेटीपदीकसा जि. प. शाळेच्या शिक्षिकेला गावातील नागरिकांनी व पालकांनी दिला निरोप.

ऋषी सहारे

संपादक

          कोरची तालुक्यापासून १९ किलोमीटर अंतरावर येत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलेटीपद्दीकसा येथील प्राथमिक शिक्षिका कुमारी किरण गुलाबराव ठाकरे यांची बदली कुरुड (वडसा) येथे झाली त्यानिमित्ताने मुलटीपद्दीकसा येथील विद्यार्थी, गावकऱ्यांनी व पालकांनी निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

         2013 ते 2023 या दहा वर्षाच्या कालखंडात छत्तीसगड व महाराष्ट्राच्या सीमेलगत शंभर टक्के आदिवासी नागरिकांच्या मुलेटीपदीकसा गावातील शाळेत त्यांनी आदिवासी मुलांना शिक्षण दिला आहे. मुलांमध्ये प्रेम भाव, आपुलकी, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात योगदान निर्माण झाल्यामुळे गावकऱ्यांनी ठाकरे शिक्षिकाचा निरोप समारंभ ठेवला यामध्ये गावातील प्रतिनिधी व गावकऱ्यांनी शाल श्रीफळ व साडीचोळी देऊन गावकऱ्यांनी मोठ्या थाटात १ मे गुरुवारी जि. प. शाळेत सत्कार करून निरोप दिला.

        यावेळी गावातील पोलीस पाटील ईश्वरजी कल्लो, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कुमारसाय धुर्वे, जंगलुराम टेकाम, धनुराम कल्लो, नारद मुलेटी, सोनूराम धुर्वे, श्यामजी कोराम, रामप्रसाद कोराम, कैलास कचलामी, दिलीप मसराम, चुन्नूराम कचलामी, दामाजी मसराम, विशेसर मसराम, कुमकोट मु अ सुरेश कोरेटे, घुगवा नरेश परशुरामकर, अरविंद सलामे, योगेश ढोरे, मडावी सर, अंगणवाडी सेविका वासूका उईके, मीनाताई धुर्वे, दुलोबाई कचलामी, विमला मुलेटी, शारदाबाई धुर्वे, कुमारी कल्पना कुमोटी, सुखबत्ती मुलेटी व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

         निरोप समारंभ दरम्यान गावातील पोलीस पाटील ईश्वर कल्लो व ग्रा.पं.सदस्य धननुराम कल्लो यांनी ठाकरे मॅडम बाबत गावात जुडलेल्या नातेसंबंधात आपुलकीत व विद्यार्थी शिक्षणात वळविल्याने मॅडम खूप कर्तुत्वान आहेत अशी मॅडम आमच्या शाळेला पुन्हा मिळणे शक्य नाही अशा शब्दात ठाकरे मॅडमचे कौतुक केले. तर शाळेतील मुख्याध्यापक गिरवर भारत सागर यांनी ठाकरे मॅडमला विद्यार्थ्यांबद्दल खूप तळमळ होती माझे विद्यार्थी मागे राहायला नको असे त्यांना नेहमी वाटायचे असे मत निरोप समारंभात व्यक्त केले. शेवटी अल्पोहाराने कार्यक्रमाची सांगता झाली. निरोप घेत गावातून बाहेर पडताना विद्यार्थ्यांचे गोड तोंड करत ठाकरे मॅडम यांना अश्रू गहिवरले व विद्यार्थी, गावकरीही भाऊक झाले होते.