कैलास गजबे- करजगाव
चांदुरबाजार तालुक्यातिल मौजा बोदड ग्रामपंचायत कार्यालयात रानी अहिल्याबाई होळकर यांची जयंती सरपंच सुचिता मोहन चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरी करण्यात आली व नारी शक्तीचा शाल श्रीफळ व शिल्ड देऊन सम्मान करण्यात आला.
रानी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती कार्यक्रमानिमित्ताने सरपंच यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते..
यामध्ये सत्कार मुर्ती मेघा चौधरी यांनी खुप मोलाचे मार्गदर्शन केले.सरपंच सुचिता मोहन चौधरी,सचिव दुर्गा चव्हाण यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले.
या जयंती कार्यक्रमा प्रसंगी मेघा सु.चौधरी व उज्वला गो.बोरकर यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला सरपंच सुचिता मो.चौधरी,स्वाती सं.चौधरी,ग्रा.प.सदस्य मुरलीधर दे.सोलव,मोनीका अ.हरणे,निता धोटे,चौधरी अंगनवाडी सेवीका गावातील मान्यवर व्यक्ती मौसराज दांडगे,कैलास गडलिंग,किशोर तायडे,मोहन चौधरी कर्मचारी सचिन सोलव,शरद चौधरी हे उपस्थित होते तसेच गावातील महीला पुरुष उपस्थित होते.